Jump to content

स्त्रीबीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मानवी स्त्रीबीज

स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणाऱ्या दोन बीजांडकोष असतात. मुलगी वयात आल्यापासून ते पाळी बंद होण्याच्या वयापर्यंत दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. दर महिन्याला दोन्ही पैकी एक बिजांडातुन एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते उदरपोकळीत येते, ते गर्भनलिकेने ग्रहन करून फलन उपयोगासाठी वापरले जाते. या बीजांडांमध्ये मात्र २३ म्हणजे (२२+‘X’) ही गुणसूत्रे असतात. या बीजामध्ये फलित होण्याची क्षमता साधारण २४ तासांपर्यंत असते. या कालावधीत जर शुक्रजंतू उपलब्ध झाले तर गर्भधारणा होण्याचा संभव असतो. शारीरिक संबंधांनंतर शुक्रजंतू गर्भाशयातून बीजनलिकेत शिरतात. या गर्भनलिकेत स्त्रीबीजाच्या चारही बाजूंनी शुक्रजंतू चिकटतात. शुक्रजंतूंच्या टोपीतील रासायनिक प्रक्रियेमुळे स्त्रीबीजाच्या सभोवताली असलेल्या आवरणामध्ये छेद निर्माण होतो व शुक्रजंतूमधील केंद्रक म्हणजे गुणसूत्र असलेला भाग स्त्रीबीजाच्या आत शिरतो. त्याच वेळी असे काही बदल होतात की ज्यामुळे एकापेक्षा जास्त शुक्रजंतू स्त्रीबीजाच्या आत शिरू शकत नाहीत.