Jump to content

केशवराव धोंडगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केशवराव शंकरराव धोंडगे हे मराठी राजकारणी होते. हे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष या पक्षाचे एक नेते होते. नांदेड जिल्ह्यातून ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

धोंडगे १९५७ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. यानंतर १९६२, १९७२, १९८५ आणि १९९० मध्येही ते विधानसभेत पोहोचले. नांदेड जिल्ह्यांतर्गत लोहा तालुक्याच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[] हैदराबाद मुक्तिसंग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. तर १९७५ साली आणीबाणी विरोधातील आंदोलनामुळे त्यांना १४ महिन्यांचा कारावास झाला होता. आणिबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत, १९७७ साली ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षा तर्फे निवडून आले होते. मात्र १९९५ च्या निवडणुकीत रोहिदास चव्हाण यांच्याकडून ते पराभूत झाले होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "महाराष्ट्र: जानेमाने समाजवादी नेता केशवराव धोंडगे का 100 वर्ष की उम्र में निधन, शरद पवार ने जताया दुख". अमर उजाला. २७ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "शेकापचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचं १०२व्या वर्षी निधन". हिंदुस्तान टाइम्स. २७ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.