Jump to content

लिंगायत संप्रदाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिंगायत सम्प्रदाय या पानावरून पुनर्निर्देशित)

लिंगायत संप्रदाय महाराष्ट्र आणि कर्नाटकात पसरलेला एक महत्त्वाचा धार्मिक व आध्यात्मिक प्रवाह आहे. हा संप्रदाय १२व्या शतकात कर्नाटकातील समाजसुधारक आणि संत बसवेश्वर यांनी स्थापन केला. लिंगायत धर्माचे प्रमुख तत्त्वज्ञान ईश्वराचे व्यक्त स्वरूप "इष्टलिंग" म्हणून मान्य करणारे आहे.[]

लिंगायत गुरू बसव

[संपादन]

(असंबद्ध अर्थशून्य लेखन). विशिष्ट असा सिद्धां, साधना आणि धर्मगुरू एकादशसृत्र असलेला एका गुरूला मूळ पुरूष म्हाणून स्वीकारलेला तो सुधारणा धर्म होय. एका गुरूपासून प्रारंभ न होता नैसर्गिकरित्या वाढत असलेला नैसर्गिक धर्म, नैसर्गिक धर्मात प्रत्येक सिंद्धत असतात. त्यात मरीआई म्हाळ्साईच्या पूजैपासून ते ’अहं ब्रम्हास्मि सारख्या सुक्ष्म सिद्धंतापर्यत त्यात वाव आहे. सुधरणा धर्मात याला वाव मिळत नाही-त्यात एक प्रकाराचा सिद्धांत, एक प्रकारचे दर्शन आहे. असा सुधारणात्मक धर्म दिलेला महापुरूष म्हणजेच विश्वगुरू बसवेश्वर होत.

स्थावर लिंगपूजा सोडवून, हाताला कंकण बांधून

निर्धाराचे मंगळसूत्र कंटी बांधून वीर हो म्हणून

कृतार्थ केला कूडल चन्नसंगमदेवा तुमचा शरण

संगम बसवण्णांच्या श्री चरणास नमो नमो म्हणत असे (च.ब.व.६५२)

महात्मा बसवेश्वरांनी परांपरागत आलेले कित्येक आचरण सोडवून, एक नव्या प्रकारचा भक्ती मार्ग आरंभिला, हा कारणे त्यांना "प्रथमाचार्य तूंच लिंगाचार्य तूंच" असे चन्नबसवण्णांनी गाईले आहे. (च.ब.व. २८)

"प्राणलिंगाचा, भगवे वस्त्र घालण्याचा, प्रसादाचा पूर्वाश्रय काढून टाकण्याकरताच ’महागुरू' होऊन बसवेश्वरांनी अवतार घेताला. (च.ब.व. २७)

म्हाणून विश्वधर्माचे लक्षण असलेल्या लिंगायत धर्माची घटना (Constitution) जगदगुरू बसवेशांनी निर्माण केली. बसवदेव हाच लिंगायत धर्माचा आदिगुरू म्हणून द्दढ श्रद्धा ठेवलेलेच लिंगायत होय.(असंबद्ध लेखन संपले.)

विश्वगुरू बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे मुख्य सत्य जे इष्टलिंग चिन्ह त्याला मूर्त स्वरूप दिले.

  • विश्वगुरू बसवण्णांनी वचन साहित्याचे धार्मिक संविधान दिले.
  • बिश्वगुरू बसवेशांनी सांप्रदायिक योग साधनेपासून वेगळा असलेला द्दष्टीयोगाचे प्रामुख्य असलेला लिंगांगयोग (शिवयोग) दिला.
  • ’श्री गुरू बसव लिंगाय नम:' हा मंत्र बसवण्णाच्या नावापासून तयार झाला म्हणून ते लिंगायत धर्माचे आदिगुरू म्हणण्यास ज्वलंत साक्ष आहे.

लिंगायत धर्म पंचाचार, षट्‌स्थल, अष्टावरण मानतात. हा बसवादि-शरणप्रणीत धर्म आहे.

न जाणत्या मानवाला जाणता शरण बनण्यास हवा असलेला दीक्षा संस्कार व पूजा स्वातंत्र्य सर्वाना समानतेने देतो म्हणून तो धर्म आहे.

धर्मगुरू : विश्वगुरू बसवण्ण (११३४-११९६)

धर्म संहिता (धर्मग्रंथ) : वचन साहित्य

धर्म भाषा : कन्नड

धर्माचे देव नाव : शिव ( देवांचे देव महादेव )

धर्म चिन्ह : जगव्यापी, जगन्नियंताचा प्रतीक ’इष्टलिंग’ (शिवलिंगम्)

धर्म संस्कार : लिंगधारण/ इष्टलिंग दीक्षा

धर्म सिद्धान्त : शून्य सिद्धान्त

साधना : त्राटक योग (लिंगांगयोग)

दर्शन : षट्‌स्थल दर्शन

समाजशास्त् र: शिवाचार- (सामाजिक समानता)

नीति शास्त्र : गणाचार (धर्म सरंक्षककर्ता) / भृत्याचार (स्वयंसेवक, करसेवक)

अर्थ शास्त्र : सदाचार (कायक- दासोह-प्रसाद)

संस्कृति : अवैदिक शरण संस्कृति

परंपरा : धर्मपित बसवेश्वरानिच आदि पुरुष हेऊन तेव्हापासून आतापर्यत अव्याहत सतत वाहत असलेली शरण परंपरा (Heritage).

धर्म क्षेत्र : गुरू बसवण्णांचे ऐक्यक्षेत्र कूडलसंगम, शरणभूमि बसवकल्याण

धर्म ध्वज : षट्कोन - इष्टलिंगासहित केशर रंगवणे; बसव ध्वज

धर्माचे ध्येय : जाति, वर्ण, वर्ग रहित धर्मासोबत शरण समाज निर्माण (कल्याण राज्य निर्माण)

इष्टलिंग

[संपादन]

लिंगायत धर्माचे लोक गळ्यात इष्टलिंग धारण करतात. इष्टलिंग हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि ब्रह्मांडाचे प्रतीक आहे.

अष्टावरण

[संपादन]
  1. गुरू : लिंगायताना ज्ञान हेच गुरू आहे, अरिवे गुरू. लिंगायत धर्मातील गुरू व्यक्तिवाचक शब्द नाही.
  2. लिंग : लिंगायत धर्मात विश्वाकार, ब्रह्मांडाचे चिन्ह असणारे इष्टलिंग हेच लिंग आहे. लिंग शब्दाचा अर्थ स्थावर लिंग नाही. इष्टलिंगासाठी लिंग हा छोटा शब्द वचनांत आणि अभंगांत वापरला आहे.
  3. जंगम : जंगम म्हणजे लिंगायत धर्मप्रसारक, प्रचारक. जंगमत्व जातीने मिळत नाही. ते कर्मावर आधारित आहे.
  4. पादोदक : ज्ञानाचे अर्जन करणे म्हणजे पादोदक होय. इष्टलिंगावर गुरू लिंग जंगम नावांनी घेतलेली तीन तीर्थे म्हणजे पादोदक.
  5. प्रसाद : समर्पण, समर्पण भावाने जे प्राप्त होते ते स्वीकारणे. त्याप्रमाणे जीवन जगणे.
  6. विभूती : शुद्ध गोमयापासून बनविलेली विभूती. विभूती आणि भस्म हे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत.
  7. रुद्राक्ष : नैसर्गिकरीत्या वृक्षांवर उत्पन्न होणारे, आवळ्याच्या आकाराएवढे रुद्राक्ष, कोणीही धारण करु शकतो, त्यासठी कोणतेही बंधन वा सुतक नाही.
  8. मंत्र : श्री गुरू बसव लिंगाय नमः, ओम नमः शिवाय किंवा ओम लिंगदेवाय नमः हे लिंगाचे आणि धर्मगुरू बसवण्णांचे स्मरण करणारे मंत्र आहेत. कायकाकवे कैलास हा आर्थिक सिद्धान्त रूढ करणारा मंत्र बसवण्णांनी विश्वाला दिला.

षट्‌स्थल

[संपादन]

१. भक्तिस्थल : श्रद्धाभक्तिस्थल. भक्ती आणि लिंग या दोन्हीचा संगम होऊन लिंगाचे स्वरूप भक्ताला प्राप्त होते.

२. महेश्वरस्थल : निष्ठाभक्तिस्थल. हे हृदय पावित्र्याचे प्रतीक आहे. इष्टलिंग, वचनसाहित्य यावर निष्ठा ठेवणे.

३. प्रसादीस्थल : एकाग्रतास्थल. समर्पणाची भावना दृढ होणे. साधकाने संपूर्ण समर्पण आणि निस्वार्थी बुद्धीने केलेली सेवा.

४. प्राणलिंगीस्थल : व्यक्ती स्वतःचा शोध घेते. स्वतः लिंगमय आहोत, अशी जाणीव होते. बाह्यगोष्टीवरून मन काढून अंतर्गत गोष्टीवर केंद्रित करणे.

५.. शरणस्थल : आनंदीस्थल. या स्थळात शरण सर्व भेद विसरून जातो. आपल्या सर्व विकारांवर आणि षड्रिपूंवर विजय मिळवणे.

६. ऐक्यस्थल : समदर्शन समरसता म्हणजे ऐक्य. जिवंतपणी शरण गुरू, लिंग, जंगम यांच्याशी ऐक्य झालेले असतो त्यामुळे मी- माझे, तू- तुझे, असे भेद असत नाहीत.

पंचाचार

[संपादन]

१) लिंगाचार : अंगावरील लिंग हे नीतीचे आणि शिलाचे प्रतीक आहे, ते अंगावर धारण करणे.

२) सदाचार : शुद्धता, सरलता, नैतिकतेने आचरण करणे. चोरी, आत्मस्तुती, परनिंदा, राग , घृणा हे सर्व न करणे, खोटे न बोलणे, परस्त्री, परधन यांची अभिलाषा न ठेवणे म्हणजे सदाचार.

३) शिवाचार : सर्वांशी समतेने आणि समानतेने वागणे, सकल जीवांचे कल्याण चिंतणे.

४) गणाचार : स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी लढा देणे, समाजातील दृष्ट आणि अन्यायकारक प्रवृत्तींविरुद्ध उभे राहणे. अधर्मीच्या विरुद्ध संघटित होऊन लढा देणे.

५) भृत्याचार : विश्वबंधुत्वाची शिकवण, दया, क्षमा, करुणा अंगी बाणविणे म्हणजे भृत्याचार.

धर्मग्रंथ :

[संपादन]

शाकाहार

[संपादन]

सर्व लिंगायतांना शाकाहारी असणे आवश्यक आहे. मद्य, मांस, भिक्षेत मिळालेले अन्न निषिद्ध आहे.

स्मृती, इतिहास, वगैरे

[संपादन]

बसवकल्याण, उळवी, कर्दळीबन(श्रीशैल) येथे असणारे शरणांच्या गुहा(गवी) आज सुस्थितीत आहेत. कल्याणचा अनुभव मंटप तसेच शिरोबावी आजही पहायला मिळतो. कल्याणच्या बिज्जल राजाचा किल्ला आजही पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. बसवादी शरणांच्या जन्मस्थळे, समाधीस्थळ आणि स्मृतिस्थळांचे पुनःर्जीवन जीर्णोद्धार झाले आहे. महामने बसवकल्याण येथे १०८ फूट उंचीची वरदहस्ती बसवप्रतिमा उभी करण्यात आली आहे.

परंपरा

[संपादन]

लिंगायत संस्कार

[संपादन]

इष्टलिंग दीक्षा संस्कार

शरण आणि संत

[संपादन]
  • लिंगायत धर्म: महात्मा बसवेश्वर धर्म प्रसारक (बसवण्णा.)
  • अक्कमहादेवी
  • शिवयोगी सिद्धरामेश्वर.
  • चांभार हरळय्या
  • अंबिगर चौडय्या
  • बुरुड केतय्या
  • मादार चेन्नय्या.
  • धनगर वीर गोल्लाळ
  • नुल्लीय चंदय्या
  • अल्लमप्रभु
  • उरलिंगदेव आणि उरिलिंग पेद्दी
  • ढोर संत कक्कय्या
  • किन्‍नरी बोमय्या
  • चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णा
  • जेडर दासिमय्या
  • मडीवाळ माचीदेव.
  • शिवयोगी मन्मथ शिवलिंग स्वामी
  • संतकवी लक्ष्मण महाराज
  • राष्ट्रसंत वसुंधरारत्न प.पु.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज

लिंगायत क्षेत्र :

[संपादन]

कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार(बीड महाराष्ट्र), बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), एम.के., हुबळी( विजापूर कर्नाटक.), कारिमनी (बेळगाव), कक्केरी (बेळगाव), गुड्डापूर जत (सांगली महाराष्ट्र), आळते डोगर (हातकणंगले, कोल्हापूर), गदग (कर्नाटक), बसवन बागेवाडी -इंगळेश्वर (कर्नाटक)


लिंगायतांतील पोटजाती

[संपादन]
  • लिंगायत वाणी
  • लिंगायत चांभार
  • लिंगायत कुंभार
  • लिंगायत कुल्लेकडगी
  • लिंगायत कोष्टी
  • लिंगायत गवळी
  • लिंगायत गुरव
  • लिंगायत चतुर्थ
  • लिंगायत जंगम
  • लिंगायत डोहर कक्कय्या
  • लिंगायत तांबोळी
  • लिंगायत तिराळी
  • लिंगायत दीक्षावंत
  • लिंगायत देवांग
  • लिंगायत धोबी
  • लिंगायत तेली
  • लिंगायत न्हावी
  • लिंगायत पंचम
  • लिंगायत परीट
  • लिंगायत फुलारी
  • लिंगायत रेड्डी
  • लिंगायत लिंगडेर
  • लिंगायत लिंगधर
  • लिंगायत कानोडी
  • लिंगायत शीलवंत
  • लिंगायत साळी
  • लिंगायत सुतार
  • लिंगायत माळी

लिंगायत धर्माची माहिती देणारी संकेतस्थळे

[संपादन]

https://vachaanjivani1.wordpress.com

https://vachsanjivani.simdif.com[permanent dead link]

http://www.lingyatyuva.com[permanent dead link]

http://www.lingayrelion.com[permanent dead link]

लिंगायत धर्मावरील पुस्तके

[संपादन]

१. लिंगायत एक स्वतंत्र धर्म, डॉ.राजशेखर सोलापुरे.

२. युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर, लेखक: अशोक मेनकुदळे.

३. एकविसाव्या शतकाचे प्रेरणास्रोत जगतज्योती महात्मा बसवेश्वर, लेखक प्रा. आनंद बळीराम कर्णे.

४. शरण जीवन दर्शन, लेखक: राजू ब. जुबरे.

५. महात्मा बसवण्णांचा वचनसंदेश, लेखक: प्रा. आनंद बळीराम कर्णे.

६. परिवर्तनाचा महामेरु महात्मा बसवेश्वर (डॉ. सचितानंद बिचेवार).

७. लिंगायत दर्शन, संपादक:डॉ.राजशेखर सोलापुरे, लातूर.

८. पूर्णावतारी बसवण्णा (मराठी), मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. अनुवादकः मल्लिनाथ चं. ऐनापुरे.

९. शरण आंदोलन आणि वचन साहित्य, लेखक: प्रा. भीमराव पाटील आणि डॉ. विजयकुमार करजकर.

१०. परिपूर्ण मानव बसवण्णा, अनुवादिका: प्रा. शालिनी श्रीशैल दोडमनी, मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी.

११. क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर आणि १२ वे शतकः महिलांचा सुवर्णकाळ. लेखक: नागप्पा भीमराव शरणार्थी.

१२.महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्त्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे)

१३. महात्मा बसवेश्वर  : काळ, व्यक्ती, वचनसाहित्य आणि शरणकार्य (डॉ. अशोक प्रभाकर कामत)

१४.महात्मा बसवेश्वर आणि शिवशरण - सुभाष वैरागकर

१५. महात्मा बसवेश्वर आणि संत तुकाराम - सुभाष वैरागकर

१६. बसवामृत - बालाजी कामजोळगे


हिंदी पुस्तके :

१. कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी)

२. बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे)


English reference book :

१. Communal Harmony Lingayat religion and other literature, author: Nagshetty K. Shetkar.

२. Lingayat is an independent religion, Author: sanjay makal.

  1. ^ "कर्नाटक सत्ता की कुंजी, जातियों के पास?". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2013-05-05. 2024-12-14 रोजी पाहिले.