Jump to content

देवी पॉइंट (चिखलदरा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवी पॉइंट चिखलदरा गावापासून एक किलोमीटरवर आहे. शेवटी काही पायऱ्या उतरून इथे जाता येते. डोंगरातील एका भुयारात ही देवी वसलेली आहे. तिच्या डाव्या बाजूस चंद्रभागा नदीचा उगम आहे. नदीचे पाणी देवासमोरील छोट्या कुंडात जमा होऊन सरळ दरीत कोसळते. देवी पॉइंटहून जवळच मोझरी पॉइंट आहे.

हे चंद्रभागा नदीचे उगम स्थान आहे. दोन मोठ्या दगड शिला एकावर एक ठेवल्यासारख्या दिसतात व त्या खालुन एक छोटा झरा निघुन चंद्रभागा नदी बनते व लांब दरीत कोसळते. तेथेच दगडांखाली चंद्रभागा देवीचे मंदिर आहे. येथून चिखलद-याच्या दरीचे दृष्य दिसते. पावसाळ्यात तेथे इंद्रधन्युष्ये दिसतात.