जागतिक मधमाशी दिन
जागतिक मधमाशी दिन हा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेद्वारा घोषित केलेला एक आंतरराष्ट्रीय दिवस असून, दरवर्षी २० मे रोजी याचे प्रतीपालान केले जाते.[१]
२० मे हा अँटोन जानसा यांचा वाढदिवस आहे, ज्यांनी १८ व्या शतकात त्यांच्या मूळ स्लोव्हेनियामध्ये आधुनिक मधमाशी पालन तंत्राचा पायंडा पाडला होता.[२][३]
दरवर्षी २० मे रोजी जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यासाठी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बीकीपर्स असोसिएशन (Apimondia) आणि खाद्य व कृषी संस्था यांच्या पाठिंब्याने स्लोव्हेनिया प्रजासत्ताकाने मांडलेला प्रस्ताव २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मंजूर केला.[२][३][१]
२०२४ ची संकल्पना - मधमाश्या आणि विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन, जागतिक मधमाशी दिवस २०२४ हा "युवांसोबत मधमाशी संलग्न" या थीमवर लक्ष केंद्रित करतो. ही संकल्पना मधमाशीपालन आणि परागकण संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तरुणांना सामील करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते, त्यांना आपल्या पर्यावरणाचे भविष्यातील कारभारी म्हणून ओळखते.[४][१]
मधमाशांचे मूल्य
[संपादन]मधमाश्या, फुलपाखरे, वटवाघुळ आणि हमिंगबर्ड्स हे परागीभवनास उपयुक्त जीवजंतू असून मानवी क्रियाकलापांमुळे त्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. परागीभवनामुळे विविध पिकांसह अनेक वनस्पतीं मध्ये प्रजोत्पादन होते. यामुळे विविध प्रकारचे बीज, फळे आणि फुले शाकाहारी प्राण्यांना व मानवास अन्न म्हणून प्राप्त होतात. जगभरातील चारपैकी तीन अन्नपिके ही परागीभवनावर अवलंबून असतात. जगात फुलपाखरू, पक्षी आणि वटवाघुळ यासारख्या विविध प्रजाती आहेत. यात सर्वात मोठे योगदान हे मधमाश्यांचे आहे. जगात मधमाशांच्या २५,०००० ते ३०,००० प्रजाती आहेत. जगाच्या एकूण पीक उत्पादनात ३५ टक्के योगदान हे मधमाशांचे आहे. जगभरातील ११५ प्रमुख अन्न पिकांपैकी ८७ पिके ही परागीभवनावर अवलंबून आहेत.[४][१]
आवाहने आणि त्यावरील उपाय
[संपादन]विविध शत्रू कीटक, रासायनिक कीटकनाशके, जमिनीची यांत्रिक मशागत आणि एकसरी पीक पद्धतीमुळे परागीभवनास व मधमाश्यांच्या वसाहतींना धोका निर्माण होत आहे.[४][१]
- उपाय:
- देशी वनस्पतींचे विविध संच लावणे, जे वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी फुलतात;
- स्थानिक शेतकऱ्यांकडून कच्चा मध खरेदी करणे;
- शाश्वत कृषी पद्धतींमधून उत्पादने खरेदी करणे;
- आपल्या बागांमध्ये आणि शेतात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा तणनाशके टाळणे;
- जेव्हा शक्य असेल तेव्हा वन्य मधमाश्यांच्या वसाहतींचे संरक्षण करणे;
- मधमाशांचे पोळे प्रायोजित करणे;
- उन्हाळ्यात मधमाशी व पक्षांसाठी ण्याचे भांडे बाहेर ठेवणे;
- वन परिसंस्था टिकवून ठेवण्यास मदत करणे;
- अशा प्रकारची माहिती समजमध्यामे आणि आंतरजालावर सामायिक करून जागरूकता वाढवणे;
- परागकण-अनुकूल कीटकनाशक धोरणे;
- परागकण अधिवासांचे संवर्धन आणि संवर्धन;
- इकोसिस्टम सेवांसाठी मूल्यांकन, प्रोत्साहन आणि देयके;
- सहभाग, ज्ञान-वाटप, आणि ग्रामीण आणि स्थानिक लोक आणि स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण;
- जनजागृती आणि ज्ञानाची देवाणघेवाण;
- नैसर्गिक अधिवासाखाली काही क्षेत्र सोडणे;
- रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणे किंवा बंद करून जैविक व सेंद्रिय कीटकनाशके वापरणे;
- घरटी साइट सोडणे; आणि
- शेताभोवती मधमाशी करिता पूरक पिके आणि बांधावरील वनस्पती लावणे.[४]
यामुळे धोरणात्मक स्तरावर, अधिक वैविध्यपूर्ण शेती आणि विषारी रसायनांवर कमी अवलंबित्व यामुळे परागणात वाढ होते, ज्यामुळे अन्नाची गुणवत्ता सुधारते आणि अन्नाचे प्रमाण वाढण्यास प्रोत्साहन दिले जाते.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d e "World Bee Day 20 May". un.org. २० मे २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "World Bee Day". www.un.org.
- ^ a b "On Slovenia's initiative, the UN proclaims May 20 as World Bee Day". RTVSLO.si.
- ^ a b c d e "World Bee Day". विकसपिडिया. २० मे २०२४ रोजी पाहिले.