चाळसंस्कृती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
चाळसंस्कृती म्हणजे चाळीतील जीवन. पूर्वी मुंबईमध्ये दादर, परळ, लोअर परळ, गिरगाव, लालबाग इत्यादी भागात चाळसंस्कृती नांदत होती.पुढे ती कल्याण, डोंबिवली भागांत पसरली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून उपजीविकेचे साधन असलेल्या मुंबई महानगरच्या जवळ आणि रेल्वे जवळ आणि किफायतशीर असल्याने जास्त सोईस्कर म्हणून चाळीत लोक राहत असत.योग्य वयात योग्य संस्कार करण्यात चाळीचा मोठा वाटा असे.[१]
चाळ
[संपादन]चाळ म्हणजे एक तीन ते चार मजली लांबलचक इमारत आणि तशीच इमारत समोर उभी.प्रत्येक चाळीत पंधरा ते सोळा घरे असत. चाळीत सामायिक संडास असायचा. बाल्कनी सामायिक असायची.सामायिक पाण्याचा नळ असायचा.[२]
चाळीतील जीवन
[संपादन]माणसा माणसांमध्ये खूप नितळ आणि मोकळेढाकळे संबंध असायचे. कोणीही कोणाच्याही घरात जात असे आणि हक्काने सहज काही खाऊ शकत असत. चाळ ही प्रत्येक माणसाला घट्ट धरून राहत होती. चाळीतील प्रत्येक घराचा स्वतंत्र स्वभाव होता. कुणी रागीट, कुणी हसतमुख, कुणी खवट, कुणी विनोदी अशी वेगवेगळ्या प्रकारची माणसे चाळीत एकोप्याने राहत असत. एकत्र मैदानात खेळत असत. एकत्र जेवायला बसत असत. रविवारी लागलेलं रामायण, महाभारत एकाच घरात पाहायला जायचं कारण दुरदर्शन संच एकाच घरात असायचा.क्रिकेट सामना वगैरे सर्व काही एकाच घरात आनंदाने पाहायले जायचे आणि क्रिकेटचे चौकार, षटकार हे उत्सव साजरा करतात त्याप्रमाणे आनंदाने उड्या मारत अनुभवायचे.सगळ्या चाळीच्या खाद्यसंस्कृतीत विविधता असायची.ब्राह्मण, आगरी, गुजराती, मुस्लिम, कोकणी असे सगळे एकत्र मिळून मिसळून खाण्यासाठी जमत असत.[३]