सुवर्ण मंदिर (श्रीपुरम)
Appearance
श्रीपुरम हे स्थान वेल्लूरपासून ८ किमी. आणि चेन्नईपासून १७५ किमी. अंतरावर आहे. येथे महालक्ष्मीचे सुवर्णमंदिर आहे. मलाईकोडी टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिराचे बांधकाम सन २००१ साली सुरू झाले. दि. २४ ऑगस्ट २००७ला मंदिर जनतेसाठी खुले करण्यात आले. हे मंदिर १०० एकर जागेवर वसलेले असून त्याचे बांधकाम ५५०० चौरस फुटांचे आहे. मंदिराच्या बांधकामात ४५ ते ५० टन तांब्याचा तसेच १.५ टन सोन्याचा वापर करण्यात आला आहे.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ तरुण भारत, नागपूर-ई-पेपर-,दि.०३/११/२०१३,आसमंत पुरवणी पान क्र. ८ (मथळा:श्री महालक्ष्मी सुवर्णमंदिर श्रीपूरम्) दि.०३/११/२०१३ रोजी १२.३६ वाजता जसे दिसले तसे.