काउंटी क्रिकेट मैदान (नॉर्थम्पटन)
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | नॉर्थम्पटनशायर, इंग्लंड |
स्थापना | १८८५ |
आसनक्षमता | ६,५०० |
| |
प्रथम ए.सा. |
१९ मे १९९९: दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका |
अंतिम ए.सा. |
३१ मे १९९९: बांगलादेश वि. पाकिस्तान |
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
काउंटी क्रिकेट मैदान, नॉर्थम्पटन हे इंग्लंडच्या नॉर्थम्पटनशायर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील नॉर्थम्पटनशायर काउंटी क्रिकेट क्लबचे हे घरचे मैदान आहे.
१९९९ क्रिकेट विश्वचषकात १९ मे १९९९ रोजी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. याआधी १२ जून १९३७ रोजी इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिलांमध्ये या मैदानावर पहिला महिला कसोटी सामना खेळविण्यात आला. तर १३ ऑगस्ट २००४ मध्ये इंग्लंड महिला आणि न्यू झीलंड महिलांनी या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. या मैदानावरचा पहिला महिला ट्वेंटी२० सामना हा २२ ऑगस्ट २००८ रोजी इंग्लंड महिला आणि दक्षिण आफ्रिका महिलांमध्ये झाला.