इन्यो काउंटी (कॅलिफोर्निया)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील इन्यो काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, इन्यो (निःसंदिग्धीकरण).
इन्यो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र इंडिपेंडन्स येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,०१६ इतकी होती.[२]
या काउंटीची रचना १८६६मध्ये झाली. या काउंटीला तिंबिशा भाषेतील इन्नियुन (ते धोकादायक आहे) या शब्दप्रयोगावरून दिलेले आहे.[३]
अमेरिकेच्या ४८ राज्यांमधील सगळ्यात खोल ठिकाण बॅडवॉटर बेसिन (समुद्रसपाटीखाली ८५.५ मीटर) आणि सगळ्यात उंच ठिकाण माउंट व्हिटनी (समुद्रसपाटीच्या वर ४,४२१ मीटर) ही दोन्ही ठिकाणे इन्यो काउंटीत एकमेकांपासून फक्त १४५ किमी अंतरावर आहेत.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. मे 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. जून 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Inyo County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.
- ^ William Bright & John McLaughlin, "Inyo Redux", Names 48:147-150 (2000)