दृष्टिपटल (पुस्तक)
Appearance
हे डॉ.माधवी मेहेंदळे यांचे पुस्तक आहे. वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय पेशामधील बरे वाईट अनुभव, या क्षेत्रातील वृत्ती-प्रवृत्ती यांचे चित्रण या पुस्तकात आहे. एक प्रकारे लेखिकेचा हा वैद्यकीय व्यवसायातील प्रवास आहे. माधवी मेहेंदळे या चित्रकार असल्याने त्यांच्या लिखाणाला एक तौलनिक परिमाण प्राप्त झाले आहे. 'एका संवेदनशील मनाने प्रांजळपणे कथन केलेला देहाच्या अभ्यासापासून ते देहाच्या जाणिवेपलीकडच्या अनुभवविश्वातला दृष्टिपटल हा प्रवास आहे,' हे मलपृष्ठावर लिहिलेले विधान पुस्तकाची तोंडओळख करून देते.
साचा:दृष्टिपटल | |
लेखक | [[डॉ.माधवी मेहेंदळे]] |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | आत्मकथनपर लेख |
प्रकाशन संस्था | ग्रंथाली प्रकाशन |
प्रथमावृत्ती | जुलै २०१४ |
मुखपृष्ठकार | सतीश भावसार |
विषय | वैद्यकीय विषयावरील लेख |
पृष्ठसंख्या | १३२ |
आय.एस.बी.एन. | 978-93-84475-05-5 |
पुरस्कार | पुणे नगर वाचन मंदिरातर्फे पुरस्कार |