ऑपरेशन कंपास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑपरेशन कंपास ( इटालियन: Battaglia della Marmarica ) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान पश्चिम वाळवंटी मोहिमेची पहिली मोठी ब्रिटिश लष्करी उपमोहीम होती. ब्रिटिश साम्राज्य आणि कॉमनवेल्थ सैन्याने डिसेंबर १९४० ते फेब्रुवारी १९४१ या काळात पश्चिम इजिप्त आणि लिब्याच्या पूर्वेकडील प्रांत सायरेनेका येथे मार्शल रोडॉल्फो ग्राझियानीच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या इटालियन सैन्यावर हल्ला केला.

मोहीमेच्या अंती ब्रिटिशांनी १,३८,००० इटालियन आणि लिब्यन कैदी, शेकडो रणगाडे आणि १,००० तोफा तसेच आणि अनेक विमाने ताब्यात घेतली. त्यांचे १०% म्हणजे सुमारे १,९०० सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले.

इटलीचे एल३/३३ प्रकारचा छोटा रणगाडा
क्रुझर मार्क १ रणगाडा
मटिल्डा रणगाडा

संदर्भ[संपादन]