स्वामी (कादंबरी)
Appearance
स्वामी | |
लेखक | रणजित देसाई |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रकाशन संस्था | मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे |
आय.एस.बी.एन. | ८१-७७६६-६४४-४ |
पुरस्कार | साहित्य अकादमी, ह. ना. आपटे |
स्वामी ही रणजित देसाई यांनी लिहिलेली मराठी भाषेतील ऐतिहासिक कादंबरी आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. मेहता पब्लिशिंग हाउसद्वारे १९६२ साली कादंबरी प्रकाशित करण्यात आली होती.
ही कादंबरी वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तकांमध्ये याची गणना होते.[१][२] थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तुत्व आणि त्यांचे वैयक्तिक जीवन यांचे अतिशय प्रभावी चित्रण पुस्तकात आहे.
१९६४ साली पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८७ साली "स्वामी"वर आधारित त्याच नावाची दूरचित्रवाणी मालिका तयार करण्यात आली होती.
हे सुद्धा पहा
[संपादन]- स्वामी (दूरचित्रवाणी मालिका)
संदर्भ
[संपादन]- ^ "11 Best Marathi Books Of All Time - Must Reads | Cart91". www.cart91.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-13 रोजी पाहिले.
- ^ "Best MARATHI Books Of ALL TIME (62 books)". www.goodreads.com. 2022-01-13 रोजी पाहिले.