Jump to content

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केंद्र सरकारने अलीकडेच सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे नाव बदलून यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य असे नामकरण केले आहे. अभयारण्य १७º०६’३५’ उत्तर – १७º०९’४०’ उत्तर अक्षांश आणि ७४º२०’२०’ दरम्यान वसलेले आहे. आणि 74º24’20’’ E रेखांश महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात आहे. इ.स १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला.[] अभयारण्य निर्माण परिश्रमांमागे स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे.[] []

भौगोलिक आणि वन्यजीव

[संपादन]

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य कृष्णा नदीच्या काठावर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात येते. हे महाराष्ट्रातील एकमेव मानव निर्मीत अभयारण्य आहे.[] अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १०.८७ चौ. कि.मी. आहे. अभयारण्याच्या परिसरात सरासरी ४०० मि.मी. इतका पाऊस पडतो, येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. अभयारण्य परिसरातील वने ही उष्ण व कोरड्या हवामानातील पानझडी व काटेरी वनस्पतींची असून यात गवती मैदानाचा समावेश आहे. [] सागरेश्वरा जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. []याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे.[] वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Yashwantrao Chavan Sagareshwar Wildlife Sanctuary" (PDF). Indiacode.nic.in (English भाषेत). 27 October 2022. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "'सागरेश्‍वर अभयारण्य' निसर्गसौंदर्याचा खजिना". pudhari.news (Marathi भाषेत). 23 August 2022. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "सागरेश्वरचा कर्मयोगी- धों. म. मोहिते". Dainikprqbhat.com (Marathi भाषेत). 21 March 2021. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य". esadhyanand.com (Marathi भाषेत). 4 March 2021. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "वन पर्यटन : सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य". loksatta.com (Marathi भाषेत). 24 May 2017. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "सागरेश्वरच्या अभयारण्यात आढळला बिबट्या; रानगव्याचेही झाले दर्शन". dainikprabhat.com (Marathi भाषेत). 23 November 2020. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याने जपली वनसंपदा; माळरानावर फुलले नंदनवन". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 23 July 2020. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)