Jump to content

मंगलाष्टक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगलाष्टक : हिंदूंमध्ये मातापित्यांच्या पुढाकाराने किंवा संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या भागांत म्हटल्या जात असलेल्या पद्यरचनांना मंगलाष्टक या नावाने ओळखले जाते. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून महाराष्ट्रीय हिंदू समाजात प्रचलित आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा एक भाग म्हणून मंगलाष्टके आपली ओळख राखून आहेत.

मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्यजीवनासाठी द्यावयाच्या आशीर्वचनात आहे.पारंपरिकरीत्या मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते. मात्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मंगलाष्टके स्वरचित म्हणण्याचा परिपाठही वधू वराचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी सुरू केला आहे. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे.

उदाहरण

[संपादन]
स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् । मोरेश्वरम् सिद्धीदम् ।
बल्लाळम् मुरुडम् विनायक महम् । चिंतामणिम् थेउरम् ।
लेण्याद्रीम् गिरिजात्मजम् सुवरदम् । विघ्नेश्वरम् ओझरम् ।
ग्रामे रांजणनामके गणपतीम् । कुर्यात सदा मंगलम् ।।

हे सुद्धा पहा

[संपादन]