हिंदू मूर्ती भंजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू प्रतिमा आणि किंवा स्मारके नष्ट करण्याच्या कृतीला हिंदू मूर्ती भंजन असे म्हणतात. हा हिंदूंच्या छळाचा एक प्रकार आहे. याला इंग्रजीमध्ये आयकॉनोक्लाझम असे म्हणतात. आक्रमक मुस्लिमांनी भारतीय धार्मिक प्रतिमांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिर इस्लामिक सैन्याने वारंवार नष्ट केले. काशी विश्वनाथ मंदिर कुतुब -अल-दीन ऐबक सारख्या क्रूर आणि अशिक्षित इस्लामिक आक्रमकांनी वारंवार नष्ट केले. मार्तंड सूर्य मंदिराचे अवशेष . १५व्या शतकाच्या सुरुवातीला मुस्लिम सुलतान सिकंदर बुत्शिकानच्या आदेशानुसार मार्तंड सूर्य मंदिर नष्ट करण्यात आले. मुस्लिम शासक मूर्ती भंजन करणारे म्हणून स्वतःला बुत शिकन अशी पदवी लावतांना दिसून येतात.[१] मुस्लिम मलिक काफूरच्या नेतृत्वाखालील दिल्ली सल्तनतच्या सैन्याने मीनाक्षी मंदिर लुटले आणि येथील मूर्ती फोडल्या. राणी की वाव ही पाटण येथे स्थित चौलुक्य राजघराण्याने बांधलेली एक सुंदर विहीर आहे; हे शहरबाराव्या शतकादरम्यान कुतुबुद्दीन अयबकने पाडले आणि १२९८ मध्ये क्रूरकर्मा आणि अशिक्षित अल्लाउद्दीन खिलजीने ते नष्ट केले. होयसळेश्वर मंदिर दोनदा तोडले आणि येथील मूर्ती फोडल्या गेल्या.

मंदिरे फोडून मशिदीचे बांधकाम[संपादन]

मूर्ती भंजन करतांना काशी विश्वनाथ मंदिर कुतुब -अल-दीन ऐबक सारख्या क्रूर इस्लामिक आक्रमकांनी वारंवार नष्ट केले .
मूर्ती भंजन करतांना काशी विश्वनाथ मंदिर कुतुब -अल-दीन ऐबक सारख्या क्रूर इस्लामिक आक्रमकांनी वारंवार नष्ट केले .

दिल्लीत बांधलेली पहिली मशीद, " कुव्वत अल-इस्लाम " ही वीस हिंदू आणि जैन मंदिरांच्या तोडलेल्या भागांसह बांधली गेली. काश्मीरमध्ये, सिकंदर शाह मिरी ने काश्मीरमधील सर्व मंदिरे पाडण्याचा आदेश दिला." त्याने काश्मीर प्रदेशात (उत्तर आणि वायव्य भारत) आपल्या आवाक्यात असलेली बहुसंख्य हिंदू आणि बौद्ध मंदिरे नष्ट केली.

औरंगजेब[संपादन]

औरंगजेबाच्या स्वतःच्या अधिकृत इतिहासात, त्याच्या केवळ एका वर्षाच्या राजवटीचे वर्णन करताना असे लिहिले आहे की १६७९ मध्ये फक्त एका वर्षात किमान १३२ मंदिरे नष्ट केली असे लिहून ठेवले आहे. त्याने एकूण ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केले.[२]

  1. ^ Slaje, Walter (2014-01-01). "Kingship in Kaśmīr (AD 1148–1459). From the Pen of Jonarāja, Court Paṇḍit to Sulṭān Zayn al-‛Ābidīn. Critically Edited By Walter Slaje. With an Annotated Translation, Indexes and Maps". Studia Indologica Universitatis Halensis .7. ISBN 978-3-86977-088-8.
  2. ^ Hindu 2.0 (2018-11-15). "A Brief List of the Destruction of Temples in Ancient India". Hindu 2.0 (इंग्रजी भाषेत). 2022-09-17 रोजी पाहिले.