सुदेश भोसले
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सुदेश भोसले | |
---|---|
सुदेश भोसले | |
आयुष्य | |
जन्म | जुलै १, इ.स. १९६० |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
आई | सुमन भोसले (रेडिओ गायिका) |
वडील | नरेंद्र भोसले |
अपत्ये | सिद्धान्त भोसले (गायक) |
नातेवाईक | दुर्गाबाई शिरोडकर (आजी) |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गौरव | |
गौरव | मदर टेरेसा मिलेनियम पुरस्कार २००८ |
बाह्य दुवे | |
[[१] संकेतस्थळ] |
सुदेश भोसले (जुलै १, इ.स. १९६० - हयात) सुदेश भोसले यांचा जन्म मुंबई या ठिकाणी झाला . यांच्या पत्नीचे नाव हेमा आहे,. त्यांना सिद्धार्थ व श्रुती ही दोन मुले आहेत. हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत. वेगवेगळ्या गायकांच्या आवाजांत गाणे ही त्यांची खासियत आहे.भोसले अभिनेता अमिताभ बच्चन यांची नक्कल करण्याची क्षमता म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्यासाठी विविध चित्रपटांमध्ये गीते गायली होती. आंबेडकर महाविद्यालय वडाळा येथे शिक्षण घेतले.
पूर्वायुष्य
[संपादन]सुदेश भोसले यांची आजी दुर्गाबाई शिरोडकर या त्यांच्या पिढीतल्या नामवंत शास्त्रीय गायिका होत्या. पण त्या असेपर्यंत सुदेशना त्यांच्याकडून कधीच गाणे शिकायला मिळालं नाही, कारण तेव्हा त्यांच्या मनात गाणे असे कधी आलेच नव्हते. सुदेश भोसले यांची आई सुमन भोसले यासुद्धा उत्तम गायिका होत्या आणि दुर्गाबाईंच्या तालमीत तयार झालेल्या होत्या. दोघी आकाशवाणीवर 'ए' ग्रेड गायिका म्हणून नावाजलेल्या होत्या. वडील चित्रकार नरेंद्र भोसले यांचा चित्रपटांची मोठमोठी होर्डिंग्ज रंगवण्याचा व्यवसाय होता. सुदेशना कॉलेजपासूनच पोट्रेट्स काढायचा छंद जडला होता. त्यामुळॆ ते वडिलांना पोस्टर रंगवण्यात मदत करत. 'जूली', 'प्रेमनगर',' स्वर्ग नरक' इत्यादी चित्रपटांची पोस्टर्स सुदेश भोसले यांनीच रंगवली आहेत. संजीव कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्या पाचही चित्रपटांचे डबिंग करताना संजीव कुमार नव्हते, तेव्हा त्यांना सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता. तसेच अनिल कपूर यांचा तेजाब चित्रपट डबिंग करताना अनिल कपूर परदेशात होते, म्हणून सुदेश भोसलेंना अनिल कपूर यांचा आवाज देऊन पहिल्या 25 प्रती डबिंग केल्या. नंतर अनिल कपूर आल्यावर पुन्हा डबिंग केलं, पण दोन्ही प्रती मधील फरकच कळत नव्हता, एवढं तंतोतंत डबिंग झालं होतं !
संगीताचे शिक्षण
[संपादन]आई एवढी उत्तम गायिका असूनही तिने सुदेशना समोर बसवून गाणे शिकवले नाही. गाणे घरात आणि स्वतःत असूनही, जेव्हा सुदेश 'मेलडी मेकर्स'मध्ये गेले तेव्हा त्यांच्या गायनावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर ते शास्त्रीय संगीतावर भर द्यायला लागले. गाणे आणि पेंटिंग हे जवळ असूनही त्याचे शिक्षण ज्या वयात व्हायला हवे होते तेव्हा झाले नाही. अनुभवाने ते हळूहळू गाणे शिकत गेले.
सुदेश भोसले यांचे गाणे हे केवळ त्यांच्या छंदातून, आणि गायकांच्या नकला करणे हे कॉलेजमधल्या टाइमपासमधून सुरू झाले.
सांगितिक कारकीर्द
[संपादन]गायन क्षेत्रात ‘कारकीर्द’ करावयाचे ठरल्यानंतर सुदेश यांनी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आज विविध कॉन्सर्टांंमधून, परदेश दौऱ्यातून परफॉर्मन्स देणारे सुदेश भोसले हे ‘दुर्गाबाई शिरोडकरांचे’ नातू आहेत हे कळल्यावर गायन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे आदराने कानाची ‘पाळी’ पकडतात ते पाहून सुदेश गहिवरतात. लतादीदी, आशाताई, पं. हृदयनाथ, गुलाम मुस्तफा खान यांसारख्या दिग्गजांनी आपल्या आजीविषयी काढलेले भावोद्गार ऐकून ते हेलावतात.
आपल्या गायनश्रेष्ठ आजीचा सहवास आपल्याला फार काळ लाभला नसला हे जरी खरे असले तरी त्याची भरपाई सुदेश एका ‘म्युझिक इन्स्टिटय़ूट’च्या उभारणीने करत आहेत. दुर्गाबाईंनी गायलेल्या अप्रतिम बंदिशी आणि विविध राग यांचे मैफलीतून झालेले सादरीकरण ते रेकॉर्ड, कॅसेटच्या माध्यमातून जतन करून ठेवीत आहेत. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि दुर्गाबाईंची गायनस्मृती जपून ठेवण्याच्या उद्देशाने ते गोव्यातील ‘शिरोडा’ येथे दुर्गाबाईंच्या राहत्या घरी ‘कलाघर’ हा उपक्रम साकारत आहेत. दुर्गाबाईंविषयीच्या उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी व दुर्गाबाईंचे नात-जावई शंकर पटनाईक यांनी फिल्म डिव्हिजनसाठी एक लघुचित्रपटही बनविलेला आहे.
सुदेश भोसले यांना झलझाला (1988) चित्रपटातील पार्श्वगायनातील पहिला मोठा ब्रेक मिळाला. संजीव कुमार, अनिल कपूर अशा अनेक कलाकारांसाठी ते व्यावसायिक डबिंग कलाकार म्हणून मिमिक्रीचा वापर करीत असे.प्रोफेसर की पडोसन हा चित्रपट पूर्ण करण्यापूर्वी संजीव कुमार यांचे जेव्हा अकाली निधन झाले तेव्हा त्यांनी संजीव कुमारसाठी प्रत्यक्षात आवाजाचे डबिंग . त्यांनी २००८ मध्ये घाटोथकच या चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. भोसले सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील गायन स्पर्धा के फॉर किशोरचे निर्माता व परीक्षक आहेत . त्यांनी 1991च्या ‘हम’ चित्रपटातील ‘जुम्मा चुम्मा दे दे’ यासह अमिताभ बच्चन यांच्यासाठी बॉलिवूडची अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत. बॉलिवूड स्टार्समध्ये अशोक कुमार (दादामुनी), अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, सुनील दत्त आणि संजीव कुमार इ.च्या आवाजाची ते मिमिक्री करतात. २००८ मध्ये कोलकाता येथे झालेल्या एका समारंभात संगीतातील योगदानाबद्दल त्यांना मदर टेरेसा मिलेनियम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. []]