Jump to content

मीनल शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मीनल शहा
जन्म १८ एप्रिल, १९९२ (1992-04-18) (वय: ३२)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा मॉडेल, रिॲलिटी स्टार
प्रसिद्ध कामे एम. टीव्ही. रोडीज
बिग बॉस मराठी ३
आई रमा शहा

मीनल शहा ही एक मॉडेल आणि रिॲलिटी स्टार आहे. ती रिॲलिटी शो एमटीव्ही रोडीज रायझिंग मध्ये दिसण्यासाठी ती ओळखली जाते. २०२१ मध्ये बिग बॉस मराठी ३ मध्ये तिने भाग घेतला आणि फायनलिस्ट ठरली.[]

कारकीर्द

[संपादन]

मीनलने बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

मीनल हे रिअ‍ॅलिटी टीव्ही शोमधील एक प्रसिद्ध नाव आहे कारण ती अनेक हिंदी टीव्ही रिॲलिटी शोचा भाग आहे. मीनल लोकप्रिय हिंदी टीव्ही रिॲलिटी शो रोडीजच्या सहभागींपैकी एक होती. २०१७ च्या रोडीज स्पेशल सीझन रायझिंग स्टारमध्ये ती एक लोकप्रिय स्पर्धक होती. लीडर प्रिन्स नरुलाच्या गँगमध्ये मीनलने परफॉर्म केले.

ती नानचाकू आणि मार्शल आर्ट्समध्ये निपुण आहे. मीनलकडे एक युट्यूब चॅनल देखील आहे, जिथे ती तिच्या रोडीज प्रवासाची झलक शेअर करते. २०२१ मध्ये तिने बिग बॉस मराठी ३ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आणि फायनलिस्ट ठरली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bigg Boss Marathi 3 contestant Meenal Shah: All you need to know about this former Roadies semi-finalist - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-04-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Bigg Boss Marathi 3-मराठी शाळेत शिकलेली मिनल 'शाह' घरात कल्ला करायला झाली सज्ज". महाराष्ट्र टाइम्स.