फ्रांसिस्को दि पॉला रॉद्रिगेस अल्वेस
Appearance
फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस अल्वेस (पोर्तुगीज: Francisco de Paula Rodrigues Alves; ७ जुलै १८४८, ग्वारातिंग्वेता, साओ पाउलो, ब्राझील − १६ जानेवारी १९१९, रियो दि जानेरो) हा ब्राझीलमधील एक राजकारणी, देशाचा ५वा राष्ट्राध्यक्ष व दोन वेळा साओ पाउलो राज्याचा राज्यपाल होता.
१९०२ ते १९६ दरम्यान ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदावर असलेला रॉद्रिगेस अल्वेस १९१८ मधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ९९.१ टक्के इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाला होता. परंतु राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याअगोदरच तो इंफ्लुएंझाच्या एका साथीमध्ये आजारी पडून मृत्यू पावला.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस |
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष १९०२–१९०६ |
पुढील अफोन्सो ऑगुस्तो मोरेरा पेना |