बॅटमॅन
Appearance
बॅटमॅन | |
---|---|
प्रकाशक | डीसी कॉमिक्स |
पहिले अवतरण |
डिटेक्टिव्ह कॉमिक्स #२७ (मे १९३९) |
निर्माता |
बिल फिंगर (विकसक) बॉब केन (संकल्पना) |
दुसरे नाव | ब्रुस वेन |
भागीदारी |
रॉबिन बॅटगर्ल कॅटवुमन वंडर वुमन सुपरमॅन |
क्षमता |
|
बॅटमॅन (अर्थ: वटवाघूळ(सदृश) माणूस) हे एक काल्पनिक पात्र आहे. महानायक असलेल्या बॅटमॅनची निर्मिती बॉब केन व बिल फिंगर ह्यांनी १९३९ साली केली.तेव्हापासून बॅटमॅन हे पात्र अत्यंत लोकप्रिय बनले आहे.
काल्पनिक कथांमध्ये बॅटमॅनचे स्वरूप धारण करणारा खरा इसम म्हणजे कोट्याधीश अमेरिकन उद्योगपती ब्रुस वेन. लहानपणी आपल्या आई-वडिलांचा खून होताना पाहणारा ब्रुस गॉथम ह्या आपल्या शहरामधून गुन्हेगारी नष्ट करण्याचा चंग बांधतो. ह्यासाठी ब्रुस स्वतःला शारिरिक व मानसिकरित्या तयार करतो व वटवाघुळाचे पंख असलेला पोषाख परिधान करून गुप्तरित्या गॉथममधील गुन्हेगारांना नेस्तनाबूत करतो.
आजवर बॅटमॅनवर १० चित्रपट बनवण्यात आले आहेत ज्यांपैकी सर्वात नवीन चित्रपट क्रिस्टोफर नोलनने बनवलेला व २००८ साली प्रदर्शित झालेला द डार्क नाईट हा होय.
बाह्य दुवे
[संपादन]- संकेतस्थळ Archived 2008-03-17 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत