अस्थिबंधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अस्थिबंधन (इंग्रजी ligament) हा तंतुमय संयोजी ऊतक आहे. ही उती हाडांना इतर हाडांशी जोडते. याला आर्टिक्युलर लिगामेंट , आर्टिक्युलर लारुआ ,  तंतुमय अस्थिबंधन किंवा खरे अस्थिबंधन असेही म्हणतात . शरीरातील अस्थि जागेवर राखण्यासाठी अस्थिबंधन फार महत्त्वाचे असते. अस्थिबंधन एका हाडांना दुस-या हाडाशी जोडतात. अस्थिबंधन हाडे इतर हाडांना जोडून सांधे तयार करतात. यांच्या पेशी बहुदा परत निर्माण होत नाहीत. अस्थिबंधनांचा अभ्यास डेस्मोलॉजी म्हणून ओळखला जातो. अस्थिबंधन उती तणावाखाली असताना या हळूहळू ताणतात आणि तणाव काढून टाकल्यावर त्यांच्या मूळ आकारात परत येतात.

पायाच्या हाडांना एकत्र बांधून ठेवणारे अस्थिबंधन
पायाच्या हाडांना एकत्र बांधून ठेवणारे अस्थिबंधन

विकार[संपादन]

अतिताण दिल्या नंतर एखाद्या विशिष्ट बिंदूनंतर किंवा दीर्घ कालावधीसाठी विस्तारित ताणाखाली राहिल्यास त्यांचे मूळ आकार अस्थिबंधने टिकवून ठेवू शकत नाहीत. मग अति उभे राहिल्याने होणारे प्लांटर फसायटीस सारखे विकार उत्पन्न होतात. जर अस्थिबंधन खूप लांब झाले, तर सांधे कमकुवत होऊन आणि भविष्यात सांधे निखळण्याची शक्यता असते.

निगा[संपादन]

ऍथलीट, जिम्नॅस्ट, नर्तक आणि मार्शल आर्टिस्ट त्यांचे अस्थिबंधन लांब करण्यासाठी स्ट्रेचिंग व्यायाम करतात, ज्यामुळे त्यांचे सांधे अधिक लवचिक होतात.

लचकणे[संपादन]

पाय लचकल्यावर अस्थिबंधन दुखावण्याचे प्रकार आढळतात. यामध्ये बहुदा प्रपादकीय हाडे मोडण्याचे प्रकार प्रामुख्याने दिसून येतात. काही वेळा हाडे न मोडता फक्त अस्थिबंधन निखळते. हे भरून यायला किमान सहा महिने लागू शकतात. या काळात पायावर जोर देऊ नये. अन्यथा अस्थिबंधन जोडले जात नाही आणि अजून वेळ लागू शकतो.

शस्त्रक्रिया[संपादन]

शरीरातील बऱ्याचदा तुटलेल्या अस्थिबंधनांपैकी एक म्हणजे अँटीरियर क्रूसीएट लिगामेंट (ACL). एसीएल हे गुडघ्याच्या स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अस्थिबंधांपैकी एक आहे ज्या व्यक्तींचे गुडघे वयपरत्वे अथवा अपघाताने अस्थिबंधने गमावतात त्यांच्यावर अनेकदा पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया विविध तंत्रे आणि सामग्रीद्वारे केली जाऊ शकते. या तंत्रांपैकी एक म्हणजे कृत्रिम सामग्रीसह अस्थिबंधन बदलणे. कृत्रिम अस्थिबंधन ही पॉलिमरपासून बनलेली एक कृत्रिम सामग्री आहे, जसे की पॉलीएक्रिलोनिट्रिल फायबर, पॉलीप्रॉपिलीन, पीईटी (पॉलीथिलीन टेरेफ्थालेट), किंवा पॉलीएनएएसएस पॉली (सोडियम स्टायरीन सल्फोनेट). वर्ग:शरीरशास्त्र