Jump to content

वसंतगड (कराड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसंतगड हे कराड-चिपळूण महामार्गावरील एक गाव आहे. वसंतगड या किल्ल्याच्या दक्षिणेकडील पायथ्याशी हे गाव आहे.मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे

गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर गडाच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन महाराजांचेमंदिर लागते. मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिर जुन्या बाधणीचे आहे. अनेक गावात चंद्रसेन देवाची यात्र भरावली जाते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्‍चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.

चंद्रसेन महाराज

आत्ताचा महाराष्ट्र पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जाई. दंडकारण्याचा राजा चंद्रसेन महाराज हा मोठा तपस्वी व शिवभक्त होता. वसंतगडावरील देऊळ त्याचे आहे अशी कथा प्रचलित आहे. राम वनवासात असताना कधी काळी वसंतगडी मुक्कामी होते. वसंतगडावर रामाचे आणि मारुतीचे देऊळही आहे.

चंद्रसेन महाराज कुळदैवत

अनेक घरंदाज मराठे घराणी चंद्रसेनाला आपले कुळदैवत मानतात. जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराज यांचा विवाह लावण्याची प्रथा आहे. रामायण काळी त्या जागी चंद्रसेन महाराज बांबूच्या बेटात तपाला बसले असताना कोणत्या तरी शिकाऱ्याने चुकीने मारलेल्या बाणामुळे त्यांचा हात तुटला अशी दंतकथा आहे. त्यामुळे, मंदिरातील चंद्रसेन महाराजांच्या मूर्तीला एक हात नाही. त्यांच्या उजव्या बाजूँस जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूस जानाईदेवीची मूर्ती आहे. ही जानाईदेवी चंद्रसेन देवाची बहीण आहे, असे काहींचे मत आहे.

भक्तांनी चंद्रसेन देवाची मंदिरे आपआपल्या गावी बांधली आहेत. त्यात निमसोडचे घाडगे यानी निमसोडला तीन मंदिरे बांधली आहेत. रायगाव, धोडवाडी, पलसगाव, कोळ, पुसेसावली, विटा, खोडद अशा अनेक गावात चंद्रसेन मंदिरे आहेत.