एस.टी. कामगारांचा संप (२०२१)
एस.टी. कामगार संप २०२१ हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.)च्या कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू केलेला संप आहे. महामंडळाचे राज्य सरकारात विलीनीकरण आणि पगारवाढ या प्रमुख कारणांसाठी संप सुरू केला गेला.[१]
२८ ऑक्टोबर २०२१ रोजी संप सुरू झाला असला तरी ९ नोव्हेंबर पासून तो जास्त तीव्र झाला. परिणामतः सरकारी बससेवा ठप्प झाली. कामावर रुजू होण्यास अनेकदा बोलावूनदेखील संपात सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळाने आतापर्यंत ११,०२४ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तसेच ३८२६ जणांना बडतर्फ करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस पाठवली गेली.[२]
कारणे
[संपादन]संपामागे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण ही मुख्य मागणी आहे.[१] यासह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि पगारवाढ प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत. 28 ऑक्टोबर रोजी संघटना नेत्यांच्या कृती समितीची मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत विलीनीकरणाची मागणी वगळली गेली आणि इतर मागण्या मान्य झाल्या. या बैठकीत युनियनकडून संप मागे घेण्याचे मान्य केले गेले, परंतु कर्मचाऱ्यांच्या काही गटांना हे मान्य नव्हते. महामंडळाचे विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.[३][४]
वाटचाल
[संपादन]राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी संप सुरू केला. हा संप बेमुदत होता. परिणामतः राज्य सरकारने महागाई भत्ता जो पूर्वी १२ टक्के होता, तो आता २८ टक्के करण्याची घोषणा केली. तसेच घरभाडे भत्तासुद्धा वाढविण्याची घोषणा झाली. पण ही घोषणा झाली तरीही शेवगाव आगारातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर ४ नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांची एक संघटना अजून एकदा संपावर गेल्यामुळे अनेक आगारांमधले कामकाज विस्कळीत झाले.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "MSRTC Strike: Are ST buses running in Maharashtra? Here's what we know so far". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2022-01-17 रोजी पाहिले.
- ^ "2 महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपाला वेगळं वळण? संप कधी मिटणार?". BBC News मराठी. 2022-01-11. 2022-01-17 रोजी पाहिले.
- ^ "Explainer : राज्यातील ST कर्मचारी संपावर का आहेत? जाणून घ्या सविस्तर". News18 Lokmat. 2021-11-10. 2022-01-17 रोजी पाहिले.
- ^ a b "सहकाऱ्यांच्या मृत्यूचा दुखवटा अनिश्चित काळ असू शकत नाही; कोर्टाची एसटी संपावर नाराजी". BBC News मराठी. 2021-12-21. 2022-01-17 रोजी पाहिले.