झुंग वेई-त्संग
झुंग वेई-त्संग | |
---|---|
जन्म |
程婉珍 |
टोपणनावे | चेंग वानझेन |
पेशा | वाय ड्ब्ल्यु सी ए नेता, शिक्षक, पत्रकार |
झुंग वेई-त्संग किंवा चेंग वानझेन (程婉珍) हीला १९२६ नंतर श्रीमती चिऊ म्हणून ओळखले जात होते. ती १९२० च्या दशकात चिनी समाजसेवक, शिक्षक आणि पत्रकार होती. तिला बालकामगार आणि महिला कामगारांमध्ये रस होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाय ड्ब्ल्यु सी एच्या नेतृत्वात तीचा सहभाग होता.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
[संपादन]झुंग वेई-त्संग ही शांघायमध्ये रहात होती. तिने शांघायमधील मॅकटायर स्कूल फॉर गर्ल्समध्ये शिक्षण घेतले. ग्रीन्सबोरो येथील नॉर्थ कॅरोलिना कॉलेज फॉर वुमन येथे संगीताचा अभ्यास केला होता.[१] ती त्या कॉलेजची सर्वात पहिली आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होती.[२] तिने स्मिथ कॉलेजमधून १९१९ मध्ये पदवी प्राप्त केली.[३] ही पदवी इतिहास विषयात होती.[४][५] युनायटेड स्टेट्समध्ये असताना, ती उत्तर अमेरिकेतील चायनीज स्टुडंट्स ख्रिश्चन असोसिएशनची सदस्य होती आणि स्त्रियांसाठी बायबल अभ्यासाच्या असोसिएशनच्या समितीची अध्यक्ष होती.[६][७]
कारकीर्द
[संपादन]झुंग १९२० च्या दशकात चीन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाय ड्ब्ल्यु सी एची नेता होती.[८][९] तिने ब्रिटिश वाय ड्ब्ल्यु सी एच्या नेत्या अगाथा हॅरिसनसोबत काम केले.[१०][११] चीनच्या नॅशनल ख्रिश्चन कौन्सिलच्या नेतृत्वातही ती सक्रिय होती.[१२] वाय ड्ब्ल्यु सी ए सह, जलद औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर तिने बालकामगार नियमन आणि महिलांसाठी कामाच्या परिस्थितीमध्ये विशेष रस घेतला होता.[१३][१४] ती शांघाय बिझनेस वुमेन्स क्लबची संस्थापक अध्यक्ष होती.[१५][१६] या संदर्भात तेने एका दैनिक वृत्तपत्रात स्तंभ लिहिला होता.[१७][१८] पिंगमिन गर्ल्स स्कूल आणि सुझोउ येथील लॉरा हेगुड नॉर्मल स्कूलमध्ये तिने इंग्रजी शिकवले.[१९] तिने १९२२ मध्ये शांघाय मताधिकार संघाचे आयोजन करण्यास मदत केली होती.[१३]
स.न. १९२१ मध्ये,[२०] झुंगने जिनिव्हा येथे झालेल्या दुसऱ्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ वर्किंग वुमन आणि आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत पाहुणे वक्ता म्हणून चिनी महिलांचे प्रतिनिधित्व केले होते.[२१][२२][२३] स.न्.अ १९२१ च्या त्या प्रवासादरम्यान तिने सात आठवडे इंग्लंडमधील कारखान्यांना भेट दिली.[२४][२५] स.न्.अ १९२४ मध्ये तिने लिहिले, "औद्योगिकदृष्ट्या चीनची सुरुवात वाईट झाली असली तरी, ती अजूनही पश्चिमेकडून शिकण्यास सक्षम असण्याच्या फायद्याच्या स्थितीत आहे." असे वक्तव्य केले होते.[२६] आरोग्य आणि वैचारिक कारणांमुळे तिने १९२६ मध्ये वाय ड्ब्ल्यु सी ए सोडले आणि त्याच वर्षी ड्ब्ल्यु. वाय. चिऊ शी लग्न केले.[१३][२५]
संदर्भ
[संपादन]- ^ Greensboro College (N.C.) (1920). Echo. Allen County Public Library Genealogy Center. Greensboro, N.C. : Greensboro College. p. 182 – Internet Archive द्वारे.
- ^ "GC Goes to China". The Collegian (इंग्रजी भाषेत). 2016-09-08. 2021-11-17 रोजी पाहिले.
- ^ Smith College, Class of 1919 (1919 yearbook): 90. via Internet Archive
- ^ Mathews, Basil; Southon, Arthur Eustace (1924). Torchbearers in China (इंग्रजी भाषेत). Missionary education movement of the United States and Canada. pp. 177–179.
- ^ "A Chinese Girl with a Mission". The Children's Newspaper: 7. October 25, 1924 – Internet Archive द्वारे.
- ^ "Directory of the Chinese Students Christian Association of North America". The Chinese Students Christian Journal. 5: 78. January 1919.
- ^ "Officers and Committees of the Chinese Student Christian Association in North America". The Chinese Students Christian Journal. 5: 74. November 1918.
- ^ Drucker, Alison R. (1979-09-01). "The Role of the YWCA in the Development of the Chinese Women's Movement, 1890-1927". Social Service Review. 53 (3): 421–440. doi:10.1086/643755. ISSN 0037-7961.
- ^ LI, Yu-ning (1977-10-01). "A Study of the Young Women's Christian Association of China: 1890-1930". Chinese Studies in History. 11 (1): 18–63. doi:10.2753/CSH0009-4633110118. ISSN 0009-4633.
- ^ Porter, Lucius Chapin (1924). China's Challenge to Christianity (इंग्रजी भाषेत). Missionary Education Movement of the United States and Canada. p. 60.
- ^ "Miss Harrison in Hongkong". The Weekly Review of the Far East. December 10, 1921. p. 76 – ProQuest द्वारे.
- ^ "The National Christian Council of China". Chinese Studies in History. 27 (3–4): 73–97. 1994-04-01. doi:10.2753/CSH0009-463327030473. ISSN 0009-4633.
- ^ a b c Littell-Lamb, Elizabeth (2011). "Caught in the Crossfire: Women's Internationalism and the YWCA Child Labor Campaign in Shanghai, 1921––1925". Frontiers: A Journal of Women Studies. 32 (3): 134–166, esp. 156-158. doi:10.5250/fronjwomestud.32.3.0134. ISSN 0160-9009.
- ^ Ma, Yuxin (2005). "Women journalists in the Chinese enlightenment, 1915–1923". Gender Issues (इंग्रजी भाषेत). 22 (1): 62. doi:10.1007/s12147-005-0010-6. ISSN 1098-092X.
- ^ "Chinese Women Make Industrial Survey". China Review. 3: 55–56. July 1922.
- ^ "Shanghai Business Women". The North China Herald. February 25, 1922. p. 523 – ProQuest द्वारे.
- ^ Hutchinson, Paul (1924). China's Real Revolution (इंग्रजी भाषेत). Missionary education movement of the United States and Canada. p. 128.
- ^ Zung, Wei Tsung (March 1, 1922). "The Woman's Viewpoint: The Chinese Church and the New Industrial System". The Chinese Recorder. p. 186 – ProQuest द्वारे.
- ^ "Class of 1919 News". The Smith Alumnae Quarterly. 12: 170. February 1921.
- ^ "Chinese Woman Returns From International Congress". The Weekly Review of the Far East. January 21, 1922. p. 342 – ProQuest द्वारे.
- ^ "China to be Represented at Working Women's Congress". China Review. 1: 152. September 1921.
- ^ Cobble, Dorothy Sue (2021-05-11). For the Many: American Feminists and the Global Fight for Democratic Equality (इंग्रजी भाषेत). Princeton University Press. pp. 86, 130. ISBN 978-0-691-15687-3.
- ^ "Zung Wei Tsung". The Sacramento Star. 1921-10-31. p. 2. 2021-11-17 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Women in China in Need of Teaching". The Leader-Post. 1921-10-13. p. 7. 2021-11-17 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ a b Porter, Robin Scarland. "The Christian Conscience and Industrial Welfare in China, 1920-1941" (Ph.D. thesis, University of London, 1977): 71-72, 85.
- ^ Zung, Wei Tsung (1924). "Present Industrial Opportunity Before the Church". The China mission year book. Shanghai : The Christian Literature Society for China. pp. 388–393 – Internet Archive द्वारे.