शाकीर खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शाकीर खान (जन्मः १० एप्रिल १९८२) हे हिंदुस्थानी शास्त्रीय सतार वादनातील इटावा घराण्याचे सतारवादक आहेत.[१]

घराणे[संपादन]

शाकीर खान हे इटावा घराण्यातील आठव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचे चुलत आजोबा विलायत खान यांनी प्रचलित आणि विकसित केलेली गायकी अंगाची वादनशैली तसेच त्यांचे वडील शाहीद परवेज यांची गायकी अंगाबरोबर तंत्रकारी अंगाचा मिलाफ असलेल्या वादनशैलीचा वारसा ते पुढे चालवत आहेत.[२]

सांगीतिक परिचय[संपादन]

शाकीर खान यांचे सतारीचे शिक्षण त्यांचे वडील शाहीद परवेज यांच्याकडे झाले आहे. घराण्याच्या परंपरेनुसार शाकीर खान यांचे सतार शिक्षणाआधी गाण्याचे व तबल्याचे शिक्षण झालेले आहे. इटावा घराण्याने इमदाद खान(त्यांचे खापरपणजोबा), इनायत खान, वाहीद खान(त्यांचे पणजोबा), विलायत खान(त्यांचे चुलत आजोबा), शाहीद परवेज(त्यांचे वडील) असे अनेक वादक निर्माण केले आहेत.

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

शाकीर खान यांनी देश-विदेशातील अनेक संगीत महोत्सवातून आपले वादन सादर केले आहे. भारतातील सर्व प्रमुख महोत्सव, अमेरिका, युरोप, कॅनडा, पोलंड, फ्रांस अशा देशांतून त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय बॅंड सोबत त्यांनी फ्युजन ही केले आहे.[३] घराण्याचे आणि वाद्याचे वैशिष्टय जपत नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी स्थापन केलेल्या स्वरसेतू या केंद्रामध्ये अनेक विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने सतारीचे शिक्षण घेत आहेत.

सन्मान व पुरस्कार[संपादन]

  • पद्मनाभ चॅरिटीतर्फे विद्यासागर पुरस्कार - २००८
  • गुरुवर्य उपाध्ये स्मृती सन्मान - २०१३
  • स्वरगंध कलाभूषण पुरस्कार - २०१५
  • श्री राम मूर्ती प्रतिभा अलंकरण पुरस्कार - २०२१
  • ICCR नियुक्त कलाकार
  • आकाशवाणी कलाकार

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Shakir Khan | The Official Website" (इंग्रजी भाषेत). 2021-10-18 रोजी पाहिले.
  2. ^ Dec 21, Pune Mirror / Updated:; 2020; Ist, 06:00. "PLAN AHEAD: Catch a gig". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-10-18. 2021-10-18 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ Khanna, Shailaja (2019-07-04). "This sitarist is also a part of a jazz band" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.