एम.एस. सत्यू
Appearance
मैसूर श्रीनिवास एम.एस. सत्यू (कन्नड: ಮೈಸೂರು ಶ್ರೀನಿವಾಸ ಸತ್ಯು; ६ जुलै, १९३० - ) हे भारतीय नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी माध्यमांवरील दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, नेपथ्यकार आहेत. यांनी भारताच्या फाळणीवर आधारित गर्म हवा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. १९७३मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सत्यू यांच्याद्वारे दिग्दर्शिनत पहिला चित्रपट होता.[१] त्यांनी अमृता प्रीतम तसेच साहिर लुधियानवी यांच्या लेखनावर आणि जीवनांवर आधारित नाटके सादर केली. त्यांचे दारा शुकोह हे नाटक चर्चेचा विषय ठरले.
सत्यू यांना १९७५मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार
[संपादन]- पद्मश्री पुरस्कार (१९७५)
- संगीत नाटक अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Back Story: Separate lives". Mint. 27 July 2012. 1 November 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित.