लुपरकॅलिया
लुपरकॅलिया हा प्राचीन रोमन प्रजासत्ताकाच्या शेवटच्या काळात व प्राचीन रोमन साम्राज्यात दरवर्षी १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान रोमन लोकांकडून साजरा केला जाणारा एक उत्सव होता.
स्वरूप
[संपादन]रोमन साम्राज्यात लूपरकस ही प्रजननाची देवता मानली जात होती. त्या देवतेप्रित्यर्थ लुपरकॅलिया हा सण दर १५ फेब्रुवारीला साजरा करण्यात येत असे. या उत्सवात नग्न तरुणांच्या धावण्याच्या शर्यतीचा मु्ख्य कार्यक्रम असे. रोम शहराच्या संरक्षक भिंतीभोवती ही शर्यत आयोजित करण्यात येत असे. या शर्यतीच्या मार्गावर गर्भवती व मूल नसलेल्या तसेच मूल न होणाऱ्या स्त्रिया उभ्या राहत. धावणाऱ्या तरुणाने जर या स्त्रियांना स्पर्श केला तर प्रसूती सुलभ होईल किंवा मूल नसल्यास मूल होईल अशी त्या काळी लोकांची श्रद्धा होती. प्रत्येक स्पर्धकाच्या हाती एक चामड्याची वादी असायची. स्पर्धकांनी धावत असताना, रस्त्यात ज्या स्त्रिया उभ्या असतील त्या स्त्रियांना आपल्या हातातल्या वादीने स्पर्श केल्यानंतर त्या स्त्रीचा वांझपणा नष्ट होतो असा समज त्या काळी दृढ होता.[१]
साहित्यात
[संपादन]विल्यम शेक्सपियरने आपल्या ज्युलियस सिझर (नाटक) या नाटकात या उत्सवाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या नाटकाची सुरुवातच या उत्सवातील दृश्याने होते.
ज्युलिअस सिझरची पत्नी कॅलपर्निआ पीझोनीस हिलाही मूल नव्हते. तिला मूल व्हावे व आपल्या राज्याला वारस मिळावा म्हणून सीझरने कॅलपर्निआस मुद्दाम शर्यतीच्या मार्गावर उभे राहण्यास सांगितले व अँटनीला तिला स्पर्श करण्यास बजावले.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "प्लुटार्क - लाईफ ऑफ सिझर" (इंग्रजी भाषेत). १ जून, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
अधिक वाचनासाठी
[संपादन]- रिलीजन्स ऑफ रोम गुगल बुक (मर्यादीत पृष्ठे)
- विल्यम ग्रीन. "लुपरकफलिया इन द फिफ्थ सेंच्युरी" (इंग्रजी भाषेत). २ जून, २०१२ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)