पलक्कीळील उन्नीकृष्णन चित्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फील्ड|coach=सिजिन एन.एस., जे.एस. भाटिया|event_type=१५०० मीटर आणि ८०० मीटर}}

पलक्कीळील उन्नीकृष्णन चित्रा ही मध्यम पल्ल्याची भारतीय धावपटू आहे. तिने अनेक १५०० मीटर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. [1] पदवीची विद्यार्थिनी आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला असलेली चित्रा हिने २०१७ आणि २०१९ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. २०१६मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिने सुवर्ण पदक जिंकले आणि २०१८ च्या आशियाई स्पर्धेत कांस्य पदक मिळविले. [2]

वैयक्तिक आयुष्य आणि पार्श्वभूमी[संपादन]

केरळ राज्यातून आजवर अंजू बॉबी जॉर्ज, पीटी उषा आणि शायनी विल्सन यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या अनेक खेळाडू आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे पराक्रम ऐकून मोठी झालेली चित्रा हिचा जन्म ९ जून १९९५ रोजी केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील मुंदूर येथे झाला.


तिचे पालक रोजंदारीवर काम करायचे. तिला महिन्याला ६०० रुपये आणि केरळ क्रीडा परिषदेकडून दररोज २५ रु मिळायचे, ज्यामुळे ती मुंडूर उच्च माध्यमिक शाळेत शिकत असताना तिचे प्रशिक्षण चालू ठेवू शकली. अशा परिस्थितीवर मात करत चित्राने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदके पटकावली.

२०१३ मध्ये इटावा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या नॅशनल स्कूल अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तसंच केरळ राज्य शालेय स्पर्धांमध्ये ती सर्वोत्कृष्ट अॅथलीट ठरली. या दोन्ही स्पर्धांचे बक्षीस म्हणून तिने दोन टाटा नॅनो कार सुद्धा जिंकल्या. [4]

कारकीर्द[संपादन]

चित्राने राज्यस्तरीय व राष्ट्रीय शालेय स्पर्धांपर्यंत मजल मारली, आणि २००९ च्या केरळ राज्य शाळा ॲथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर शर्यतीत सुवर्ण आणि १५०० मीटर शर्यतीत रौप्य पदके जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. [5]


२०११ साली महाराष्ट्रातील पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये केरळच्या या कन्येने १५००, ३००० मीटर आणि ५००० मीटर शर्यतींमध्ये सुवर्ण पदके जिंकली, तसेच ३ किलोमीटर क्रॉस कंट्री शर्यतीत कांस्यपदक जिंकले.

२०११ साली महाराष्ट्रातील पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये केरळच्या या कन्येने १५००, ३००० मीटर आणि ५००० मीटर शर्यतींमध्ये सुवर्ण पदके जिंकली, तसेच ३ किलोमीटर क्रॉस कंट्री शर्यतीत कांस्यपदक जिंकले.


चित्राने पुण्याच्याच कामगिरीची पुनरावृत्ती २०१२ साली तिरुवअनंतपुरम येथे झालेल्या केरळ राज्य शालेय खेळांमध्ये केली, आणि १५०० मीटर, ३००० मीटर आणि ५००० मीटर शर्यतींमध्ये अव्वल ठरली.


२०१३ मध्ये तिने राज्य, राष्ट्रीय आणि खंड पातळीवर सुवर्ण पदके जिंकली. एर्नाकुलम येथे झालेल्या केरळ राज्य शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चित्राने मागील वर्षी जिंकलेल्या सर्व सुवर्ण पदके तिच्याकडेच कायम राखण्याचा प्रयत्न केला.


उत्तर प्रदेशच्या इटावा येथील राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये तिने पुन्हा १५०० मीटर, ३००० मीटर,५००० मीटर स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके जिंकली. तसंच २०११ मध्ये तिने ३ किलोमीटर क्रॉस कंट्री शर्यतीत जिकलेल्या कांस्य पदकाचे रूपांतर सुवर्ण पदकात केले.


त्याच वर्षी प्रथमच झालेल्या आशियाई शालेय अ‍ॅथलेटिक स्पर्धांमध्ये चित्राने ३००० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले.


२०१६ मध्ये झारखंडमधील रांची येथे झालेल्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये तिने २०१३ च्या यशाची पुनरावृत्ती करत, १५०० मीटर, ३००० मीटर, ५००० मीटर स्पर्धा आणि ०३ किलोमीटर क्रॉस कंट्री शर्यतींमध्ये सुवर्ण पदके पटकावली. [1]


त्याच वर्षी चित्राने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत १५०० मीटर मध्ये वरिष्ठ पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले सुवर्णपदक जिंकले. [6]

वाद[संपादन]

२०१७ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या १५०० मीटर शर्यतीत चित्रा अव्वल आली. मात्र एका आठवड्यानंतर तिला कळले की लंडनमध्ये होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झालेली नाही. अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियानुसार (एएफआय) तिची कामगिरी 4:07:50 या पात्रता वेळेपेक्षा कमी आहे. या निर्णयाला चित्राच्या प्रशिक्षकाने केरळच्या उच्च न्यायालयात आव्हान दिले. कोर्टाने चित्राच्या बाजूने निर्णय दिला, परंतु त्यानंतर चित्राला भारतीय संघात समाविष्ट करण्याची अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाची (एएफआय) विनंती आंतराष्ट्रीय ॲथलेटिक्स संघटनेनं (आयएएएफ) नाकारली. [7]


चित्राने झाले ते मागे टाकत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या पुढच्याच महिन्यात (सप्टेंबर २०१७) १५०० मीटर स्पर्धेत एशियन इंडोर आणि मार्शल आर्ट्स गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले. [8] त्यानंतर तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत १५०० मीटर स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आणि त्यानंतर दोहा येथे झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने जेतेपद कायम राखले. [2]

पदके[संपादन]

प्रतिनिधित्व: इंडिया


सुवर्ण : २०१९ एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप डोहा


सुवर्ण : २०१७ एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप भुवनेश्वर.


सुवर्ण : आशियाई इंडोर आणि मार्शल आर्ट गेम्स अश्गाबात


सुवर्ण : २०१६ दक्षिण आशियाई खेळ गुवाहाटी / शिलाँग


कांस्यः २०१८ आशियाई खेळ जकार्ता

संदर्भ[संपादन]