ॲलन जोन्स
Appearance
ॲलन जोन्स (४ नोव्हेंबर, १९३८:वेल्स - हयात) हा इंग्लंडकडून १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय XI क्रिकेट संघाविरुद्ध १ अनौपचारिक कसोटी सामने खेळलेला आहे.
इसवी सन १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय XI क्रिकेट संघाविरुद्ध इंग्लंडने ५ कसोटी सामने खेळले होते. त्यात इंग्लंडतर्फे ॲलन जोन्सने कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळेस सर्व सामन्यांना कसोटीचा दर्जा दिला होता. परंतु त्यानंतर आयसीसीने त्या सर्व सामन्यांचा कसोटी दर्जा काढून घेतला. इसवी सन २०२० मध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ॲलन जोन्सला इंग्लंडचा कसोटी खेळाडू म्हणून पदवी दिली. ॲलन जोन्सला इंग्लंड बोर्डाने टोपी क्रमांक ६९६ दिला.