२०२० कोरोना महामारीचा महाराष्ट्रातील घटनाक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कोव्हिड-१९ रुग्ण महाराष्ट्र, भारत  ()
     Deaths        बरे झालेले        सक्रिय प्रकरणे

Mar Mar Apr Apr May May Jun Jun Last 15 days Last 15 days

दिनांक
# रुग्ण
# of deaths
2020-03-09 (n.a.)
2020-03-10
(+१५०%)
2020-03-11
११(+१२०%)
2020-03-12
११(=)
2020-03-13
१९(+७३%)
2020-03-14
३१(+६३%)
2020-03-15
३३(+६.५%)
2020-03-16
३९(+१८%)
2020-03-17
४१(+५.१%)
2020-03-18
४५(+९.८%)
2020-03-19
४८(+६.७%)
2020-03-20
५२(+८.३%)
2020-03-21
६४(+२३%)
2020-03-22
७४(+१६%)
2020-03-23
९७(+३१%)
2020-03-24
१०७(+१०%)
2020-03-25
१२२(+१४%)
2020-03-26
१३०(+६.६%)
2020-03-27
१५३(+१८%)
2020-03-28
१८६(+२२%)
2020-03-29
२०३(+९.१%)
2020-03-30
२२०(+८.४%)
2020-03-31
३०२(+३७%)
2020-04-01
३३५(+११%)
2020-04-02
४२३(+२६%)
2020-04-03
४९०(+१६%)
2020-04-04
६३५(+३०%)
2020-04-05
७४८(+१८%)
2020-04-06
८६८(+१६%)
2020-04-07
१,०१८(+१७%)
2020-04-08
१,१३५(+११%)
2020-04-09
१,३६४(+२०%)
2020-04-10
१,५७४(+१५%)
2020-04-11
१,७६१(+१२%)
2020-04-12
१,९८२(+१३%)
2020-04-13
२,३३४(+१८%)
2020-04-14
२,६८४(+१५%)
2020-04-15
२,९१६(+८.६%)
2020-04-16
३,२०२(+९.८%)
2020-04-17
३,३२०(+३.७%)
2020-04-18
३,६४८(+९.९%)
2020-04-19
४,२००(+१५%)
2020-04-20
४,६६६(+११%)
2020-04-21
५,२१८(+१२%)
2020-04-22
५,६४९(+८.३%)
2020-04-23
६,४२७(+१४%)
2020-04-24
६,८१७(+६.१%)
2020-04-25
७,६२८(+१२%)
2020-04-26
८,०६८(+५.८%)
2020-04-27
८,५९०(+६.५%)
2020-04-28
९,३१८(+८.५%)
2020-04-29
९,९१५(+६.४%)
2020-04-30
१०,४९८(+५.९%)
2020-05-01
११,५०६(+९.६%)
2020-05-02
१२,२९६(+६.९%)
2020-05-03
१२,९७४(+५.५%)
2020-05-04
१४,५४१(+१२%)
2020-05-05
१५,५२५(+६.८%)
2020-05-06
१६,७५८(+७.९%)
2020-05-07
१७,९७४(+७.३%)
2020-05-08
१९,०६३(+६.१%)
2020-05-09
२०,२२८(+६.१%)
2020-05-10
२२,१७१(+९.६%)
2020-05-11
२३,४०१(+५.५%)
2020-05-12
२४,४२७(+४.४%)
2020-05-13
२५,९२२(+६.१%)
2020-05-14
२७,५२४(+६.२%)
2020-05-15
२९,१००(+५.७%)
2020-05-16
३०,७०६(+५.५%)
2020-05-17
३३,०५३(+७.६%)
2020-05-18
३५,०५८(+६.१%)
2020-05-19
३७,१३६(+५.९%)
2020-05-20
३९,२९७(+५.८%)
2020-05-21
४१,६४२(+६%)
2020-05-22
४४,५८२(+७.१%)
2020-05-23
४७,१९०(+५.८%)
2020-05-24
५०,२३१(+६.४%)
2020-05-25
५२,६६७(+४.८%)
2020-05-26
५४,७५८(+४%)
2020-05-27
५६,९४८(+४%)
2020-05-28
५९,५४६(+४.६%)
2020-05-29
६२,२२८(+४.५%)
2020-05-30
६५,१६८(+४.७%)
2020-05-31
६७,६५५(+३.८%)
2020-06-01
७०,०१३(+३.५%)
2020-06-02
७२,३००(+३.३%)
2020-06-03
७४,८६०(+३.५%)
2020-06-04
७७,७९३(+३.९%)
2020-06-05
८०,२२९(+३.१%)
2020-06-06
८२,९६८(+३.४%)
2020-06-07
८५,९७५(+३.६%)
2020-06-08
८८,५२९(+३%)
2020-06-09
९०,७८७(+२.६%)
2020-06-10
९४,०४१(+३.६%)
2020-06-11
९७,६४८(+३.८%)
2020-06-12
१,०१,१४१(+३.६%)
2020-06-13
१,०४,५६८(+३.४%)
2020-06-14
१,०७,९५८(+३.२%)
2020-06-15
१,१०,७४४(+२.६%)
Source: arogya.maharashtra.gov.in, COVID-19 Monitoring Dashboard by Public Health Department

२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे झालेल्या महामारीचा घटनाक्रम.

मार्च[संपादन]

मार्च १३-१४[संपादन]

  • १३ मार्च रोजी, महाराष्ट्र शासनाने कोरोना व्हायरस विषाणूचा मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या भागात उद्रेक झाला असल्याचे जाहीर केले. याच दिवशी महाराष्ट्रात महामारी रोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला. सुरक्षिततेचे उपाय म्हणून सिनेमागृहे, व्यापारी मॉल, जलतरण तलाव, व्यायामशाळा अशा सार्वजनिक ठिकाणांवर बंदी घातली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सार्वजनिक सभा, समारंभांवर बंदी घातली.
  • १४ मार्च रोजी खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातील विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगीत करण्यात आले.[१] पुणे महानगर पालिकेने, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक उद्याने तसेच राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद करण्याचा निर्णय घेतला.[२] ठाकरे यांनी कोरोना व्हायरसची चाचणी करणारी केंद्रे, आणि विलगीकरण कक्ष यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला.

मार्च १५-१६[संपादन]

  • १६ मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने कोरोना बाधीत रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांसाठी ४५ कोटींचा निधी घोषित केला. हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षातून काही कोरोनाग्रस्त रोग्यांनी पलायन केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अशा विलगीकरणाची आवश्यकता असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी, सरकारने न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या शिक्क्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हॉस्पिटल आणि विमानतळावर अशा व्यक्तींच्या डाव्या हातावर १४ दिवसाचे घरात विलगीकरण आणि विलगीकरण कालावधीचा तपशील असलेला शिक्का मारण्याचे निर्देश दिले गेले. या विलगीकरणाचा भंग करणाऱ्या व्यक्तीस सरकारी विलगीकरण कक्षात पाठविण्याचा सरकारने निर्णय घेतला.[३]

मार्च १७-१८[संपादन]

  • १७ मार्च रोजी इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय झाला.[४] नागपूर आणि नाशिकमध्ये कलम १४४ लावण्यात आले.[५]
  • १८ मार्च रोजी, पुण्यातील व्यापारी संघटनेने, औषधे आणि किराणा सोडून बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या मध्ये ४०,००० दुकानांचा समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने गर्दी टाळण्याकरता अनेक वॉर्डातील दुकाने आणि व्यापारी संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला.[६]

मार्च १९-२०[संपादन]

  • १९ मार्च रोजी मुंबईतील डबेवाल्यांनी त्यांच्या सेवा ३१ मार्चपर्यंत बंद केल्या.[७]
  • २० मार्च रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई, बृहनमुंबई महानगर प्राधिकरण, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील अत्यावश्यक सेवा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगळता सर्व गोष्टी ३१ मार्चपर्यंत बंद राहतील, अशी घोषणा केली. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले.[८]

मार्च २१-२२[संपादन]

  • २२ मार्च रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी २३ मार्चपासून राज्यभर कलम १४४ लागू करण्याची घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण राज्यभर लॉक डाऊनची स्थिती निर्माण झाली.[९]

मार्च २३-२४[संपादन]

  • २३ मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संचारबंदी लागू करण्यात आल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रामध्ये जिल्हाबंदीही करण्यात आली. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोणालाही जाता येणार नाही. जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या. सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद राहणार असून, धर्मगुरू अथवा पुजारी यांना नित्यउपक्रम करता येतील. तसेच जीवनावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यामध्ये अन्नधान्य, औषध, भाजीपाला, शेतीसाठी बी – बियाणे, जनावरांची औषधे आणि पाळीव प्राण्यांसाठी दवाखाने व अन्न उपलब्ध असणार आहे असे सांगण्यात आले.[१०]

मार्च २५-२६[संपादन]

  • २६ मार्च रोजी बृहनमुंबई महानगरपालिकेने शहरातील किराणा दुकाने, फळ आणि भाज्या दुकाने यांच्यासमोर १-१ मीटर अंतरावर चौकोन आखण्यास सुरुवात केली. सामाजिक अंतर कायम राखण्यासाठी हा उपाय करण्यात आला. हा उपाय सर्वप्रथम पुण्यात २४ मार्च रोजी अमलात आणण्यात आला होता.[११]

मार्च २७-२८[संपादन]

मार्च २९-३०[संपादन]

  • २९ मार्च रोजी इस्लामपूर शहरात २३ करोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे हे संपूर्ण शहर सील करण्यात आले.[१२]

मार्च ३१[संपादन]

एप्रिल १-२[संपादन]

  • १ एप्रिल रोजी मुंबईतील कोळीवाडा येथे करोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने कोळीवाडा सील करण्यात आला.[१३]
  • २ एप्रिल रोजी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत करून २३०५ खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी राखीव झाल्या.[१४]

एप्रिल ३-४[संपादन]

एप्रिल ५-६[संपादन]

  • ६ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून पुण्यातील सर्व पेठा, कोंढवा, सहकारनगर, पुणे रेल्वेस्थानक आणि कर्वे रस्त्याचा काही भाग, महर्षी नगर ते आरटीओ इ. भाग पुणे महानगरपालिकेने सील केला.[१५]

एप्रिल ७-८[संपादन]

  • ८ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ३ महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यामध्ये घराबाहेर पडताना मास्क घालणे गरजेचे आहे, सर्दी तापाची लक्षणे असलेल्या लोकांनी 'फिव्हर क्लिनिक' मध्येच जावे आणि वैद्यकीय पदवी असलेल्या, नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या आणि सैन्यातील मेडीकल कोअरमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त व्यक्तींना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन या तीन सूचना आहेत.[१६]



संदर्भ[संपादन]

  1. ^ "विधिमंडळाचे कामकाज शनिवारी गुंडाळणार". 13 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Maharashtra invokes epidemic Act". https://www.tribuneindia.com/news/nation/maharashtra-invokes-epidemic-act-55079. ३ एप्रिल २०२० रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ "Maharashtra Stamps Left Hand Of Those In Home Quarantine". NDTV.com. 2020-04-03 रोजी पाहिले.
  4. ^ "तिहासात पहिल्यांदाच; कोरोनामुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बंद". 12 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "Coronavirus: Section 144 imposed in Nagpur, cases jump to 39 in Maharashtra". Livemint (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.
  6. ^ "Coronavirus impact: Markets in Maharashtra in shutdown mode". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.
  7. ^ "Covid 19: Coronavirus outbreak brings Mumbai's Dabbawala services to a halt". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.
  8. ^ "Mumbai, Pune offices to close in wake of coronavirus, says Uddhav Thackeray". Livemint (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.
  9. ^ Mar 22, Mirror Online | Updated:; 2020; Ist, 16:20. "Maharashtra goes into lockdown mode: section 144 in place from Monday, announces Chief Minister Uddhav Thackeray". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  10. ^ "महाराष्ट्रामध्ये संचारबंदी". द् वायर्.[permanent dead link]
  11. ^ Deshpande, Tanvi (2020-03-27). "Social distancing: BMC marks pitches outside grocery outlets, veggie shops". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-04-03 रोजी पाहिले.
  12. ^ "सांगली : संपूर्ण इस्लामपूर शहर सील | पुढारी". www.pudhari.news (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
  13. ^ "Corona | वरळीतील कोळीवाडा परिसर सील, कोरोनाचे संशयित आढळल्यानं प्रशासन अलर्ट". TV9 Marathi (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
  14. ^ "राज्यात कोरोना उपचारासाठी 30 विशेष रुग्णालये घोषीत; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती". 11 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
  15. ^ "पुण्यातील पेठा सील; गुलटेकडी, कोंढव्यातील प्रवेशमार्ग बंद | eSakal". www.esakal.com. 2020-04-07 रोजी पाहिले.
  16. ^ "CM उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला 'आज' केलेल्या ३ मोठ्या आणि महत्त्वाच्या सूचना | eSakal". www.esakal.com. 2020-04-09 रोजी पाहिले.