निओकॅरिडीना डेव्हिडी
निओकॅरिडीना डेव्हिडी | ||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
[[चित्र:|frameless|]] | ||||||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||||||
| ||||||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||||||
Neocaridina davidi
| ||||||||||||||||||
इतर नावे | ||||||||||||||||||
|
निओकॅरिडीना डेव्हिडी हा तैवानमधे सापडणारा, गोड्या पाण्यात राहणारा आणि शोभिवंत मत्स्यपालन छंदात लोकप्रिय असणारा असा एक श्रींप (मराठीमध्ये 'कोळंबी' असे म्हणतात परंतु, मराठी मत्स्यपालन छंदोपासकही 'श्रींप' असेच संबोधत असल्यामुळे, पुढील लेखात 'श्रींप' असा उल्लेख केला जाईल) आहे. निसर्गात सापडणारा निओकॅरिडीना डेव्हिडी हा तपकिरी-हिरव्या रंगाचा असतो. शोभिवंत मत्स्यपालन छंदात हा श्रींप लाल, पिवळा, केशरी, हिरवा, निळा, जांभळा, काळा इत्यादी रंगात मिळतो, पण, लाल रूपिका (morph) असलेला चेरी श्रींप अधिक प्रमाणात विकला जातो. प्रौढ श्रींपच्या रंगाची घनता कशी असेल हे त्या-त्या रंगाच्या श्रींपचे प्रजनन कसे घडवून आणले आहे (selective breeding), यावर अवलंबून असते, यातूनच त्यांची विक्री किंमत आणि "गुणवत्ता" (ग्रेडिंग) निश्चित केली जाते.[३] "गुणवत्ता" ठरवताना सौंदर्य, आकार, वर्तन आणि वाणानुसार कमी-अधिक असणारी इतर वैशिष्ट्ये यांना विचारात घेतले जाते. पूर्ण वाढलेला श्रींप ४ सेंटीमीटर (१.६ इंच) आकाराचा असतो. या श्रींप प्रजातीला ६.५ ते ८ पीएच आणि १४–२९ °से (५७–८४ °फॅ) तापमान असणारे शुद्ध पाणी लागते. २२ °से (७२ °फॅ) तापमान हे या श्रींपसाठी सर्वोत्तम मानले जाते. निओकॅरिडीना डेव्हिडी सर्वभक्षी (omnivores) आहे. १ ते २ वर्षे ही यांची आयुर्मर्यादा आहे. पूर्वी या श्रींपचे वर्गीकरण निओकॅरिडीना हेटरोपोडा आणि निओकॅरिडीना डेन्टिक्युलाटा सायनेन्सिस असे करण्यात आले होते परंतु, आता निओकॅरिडीना डेव्हिडी हे नाव प्रजातींच्या सर्वात जुन्या प्रसिद्ध वर्णनावरून निश्चित करण्यात आले आहे.[४]
मत्स्यालयात
[संपादन]सांभाळण्यास सोपा आणि घरच्या मत्स्यालयातही प्रजनन होऊ शकणारा N. davidi लोकप्रिय आहे. याच्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे, हा श्रींप मत्स्यालयात पाळल्या जाणाऱ्या इतर माशांना ज्या पद्धतीचे पाणी लागते त्या पाण्यात सहज राहतो. इतकेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्यातही सहज राहू शकतो. या श्रींपसाठी उदासीन (neutral) किंवा थोडे अल्कधर्मी (alkaline) पीएच असणारे, शून्य अमोनिया, नायट्राईट आणि कमी नायट्रेट असणारे पाणी सर्वोत्तम ठरते. उबदार हवामानात पाणी थंड कसे ठेवता येईल ते पाहावे. काहीजण N. davidi श्रींप ४–८ लीटर (०.८८–१.८ imp gal; १.१–२.१ US gal) क्षमता असलेल्या छोट्या मत्स्यालयातही ठेवतात. ४० ली (८.८ imp gal; ११ US gal) क्षमतेचे मत्स्यालय श्रींपच्या सक्रिय कळपासाठी योग्य समजला जातो. पाणवनस्पतीयुक्त मत्स्यालय सर्वच श्रींपसाठी उपयुक्त ठरतात कारण, पाणवनस्पती प्रौढ आणि लहान श्रींपना संरक्षण प्रदान करतात. शिवाय, पाणवनस्पतींवर वाढणारा सूक्ष्मजीव समूह (बायोफिल्म) त्यांना खाद्य म्हणून मिळतो. [ <span title="This claim needs references to reliable sources. (March 2018)">उद्धरण आवश्यक</span> ]
- ^ Liang, X., 2002b. On new species of atyid shrimps (Decapoda, Caridea) from China.— Oceanologia et Limnologia Sinica 33: 167-173.
- ^ "WoRMS - World Register of Marine Species - Neocaridina heteropoda Liang, 2002".
- ^ http://www.plantedtank.net/forums/showthread.php?t=159785. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Klotz, Werner; Karge, Andreas (2013). "Gattung Neocaridina Kubo, 1938" [Genus Neocaridina Kubo, 1938]. Süßwassergarnelen aus aller Welt [Freshwater shrimp from all over the world] (जर्मन भाषेत) (3rd ed.). pp. 131–6. ISBN 978-3935175-90-6.