देवप्रिया चॅटर्जी
देवप्रिया चॅटर्जी | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | ८ जुलै १९७७ |
जन्म स्थान | प्रयागराज |
संगीत कारकीर्द | |
कार्य | बासरी वादन |
पेशा | वादक |
गौरव | |
पुरस्कार | उस्ताद बिसमिल्ला खान युवा पुरस्कार |
देवप्रिया चॅटर्जी ( ८ जुलै १९७७) ह्या बासरी वादक आहेत.[१] त्या बासरीवर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत वाजवतात. त्यांची बहीण सुचीस्मिता यासुद्धा बासरी वादक आहेत. बासरीवादक भगिनी म्हणून या दोघींना ओळखले जाते.
सुरुवातीचे आयुष्य
[संपादन]देवप्रिया ह्यांचा जन्म प्रयागराजमधल्या एका संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील कृष्णा आणि रॉबीन चटर्जी दोघेही गायक आहेत. त्यांनी देवप्रिया आणि त्यांची बहीण सुचीस्मिता ह्यांना बासरी वादन शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.[२] रॉबिन ह्यांच्या कामामुळे त्यांच्या कुटुंबाला काही वर्षे अफगाणीस्तान येथे स्थलांतर करावे लागले. भारतात परत आल्यावर देवप्रिया ह्यांनी पंडित भोलानाथ प्रसन्ना ह्यांच्याकडे बासरी वादनाचे शिक्षण घेतले. काही वर्षांनी त्यांनी पंडित हरिप्रसाद चौरासिया ह्यांच्याकडे बासरी वादनाचे पुढील शिक्षण घेतले.[३] वडिलांचे एक पूर्ण न झालेले स्वप्न त्यांच्या कन्यांनी पूर्ण केले.त्यांचे बासरी वादनाचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांना नेदरलॅंड्सच्या भारतीय दूतावासाची न्युफ्फीक शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. रॉटरडम कॉन्झर्वेटरी येथे त्यांनी जगातल्या विविध संगीत प्रकारांचा अभ्यास केला. त्यांना १९९८ साली उईतव्होएरेंड (सादर करणारा संगीतकार) आणि डोसेनटेन म्युझिकस (संगीत शिक्षक) ह्या विषयांमध्ये त्यांना विशेष योग्यतेचे प्रमाणपत्र मिळाले.[४] भारतात परत आल्यावर, २००१ साली त्यांनी प्रयागराज येथील प्रयाग संगीत समितीमधून संगीत प्रभाकर ही पदवी मिळवली. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना रौप्य पदक मिळाले. त्यांनी प्रयाग संगीत समितीमध्ये शिक्षण चालू ठेवले आणि २००५ साली संगीत प्रवीण ही पदवी मिळवली. त्यावेळी देवप्रिया ह्यांना सुवर्ण पदक मिळाले.[४] त्या सध्या मुंबईत राहतात.[५]
कारकीर्द
[संपादन]१९९५ साली, त्यांनी मुंबईतील संपूर्ण युगल संगीत रात्री ह्या सांगीतिक मैफिलीत पहिल्यांदा आपली कला सादर केली. ह्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले आणि सादरीकरणासाठी त्यांचे खूप कौतुक झाले.[४] त्यांनी आपल्या बहिणी बरोबर आणि आपल्या गुरूंबरोबर भारतात आणि जगभरात अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांनी आणि त्यांच्या बहिणीने मिळून टी. व्ही. वरील मालिकांना संगीत दिले आहे. त्यापैकी काही आहेत अफ्सार बिटिया, बालिका वधू आणि क्राईम पेट्रोल.[६] त्यांनी आणि सुचीस्मिता ह्यांनी बासरी वादनाच्या जुगलबंदीचे अनेक एकत्र कार्यक्रम केले आहेत.२०१६ साली देवप्रिया आणि सुचीस्मिता ह्यांना भारतातील प्रसिद्ध ‘बासरी भगिनी’ म्हणून ख्याती मिळाली. त्यांनी ‘सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंग्स्ट द युथ’ ह्या संस्थेमध्ये काम केले.[७] त्या बासरीला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा अविभाज्य भाग समजतात. बासरीला भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. महाभारतातल्या कृष्णाने सगळ्या जगाला आपल्या बासरीने मंत्रमुग्ध केले होते.देवप्रिया ह्यांना २००८ साली संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिसमिल्ला खान युवा पुरस्कार’ मिळाला.[८] त्या आकाशवाणीच्या मान्यता प्राप्त कलाकार आहेत.[४] त्यांना २००१ साली ‘कल के कलाकार’ ह्या संगीत महोत्सवात सूर मणी हा किताब मिळाला. त्यांनी स्वामी हरिदास संगीत संमेलन, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव,पुणे, सप्तक म्युझिक फेस्टीव्हल, अहमदाबाद येथे आपली कला सादर आहे.[९]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "CUR_TITLE". sangeetnatak.gov.in. 2020-04-02 रोजी पाहिले.
- ^ "Blowing in the wind". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-03-31 रोजी पाहिले.
- ^ "Flute Sisiters SUCHISMITA & DEBOPRIYA" (इंडोनेशियन भाषेत). 2020-03-31 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Flute Sisiters SUCHISMITA & DEBOPRIYA" (इंडोनेशियन भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.
- ^ "Blowing in the wind". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.
- ^ "The Tribune, Chandigarh, India - The Tribune Lifestyle". www.tribuneindia.com. 2020-04-03 रोजी पाहिले.
- ^ Pioneer, The. "Chatterjee sisters' flute performances from today". The Pioneer (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.
- ^ "SNA: Yuva Puraskar 2008::". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2015-10-02. 2020-03-31 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "SNA || List of Awardees". sangeetnatak.gov.in. 2020-04-03 रोजी पाहिले.