Jump to content

हेमंत देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेमंत देसाई तथा बाबू मोशाय हे मराठीत चित्रपटविषयक लिखाण करणारे एक लेखक आहेत. त्यांनी कादंबऱ्या, अर्थशास्त्रवरील पुस्तके, माहितीपर पुस्तके आणि वैचारिक आशयघन पुस्तके लिहिली आहेत.

मूळ पुण्याचे असलेले बाबू मोशाय आता पूर्णपणे मुंबईकर झाले आहेत.

चित्रपटांविषयी सबकुछ म्हणजे 'बाबू मोशाय' हे समीकरण रसिकांच्या मनात कायम ठसलेले आहे. कारण चित्रपटांचा इतिहास, कलाकार, तंत्रज्ञ,वितरक,अशा चित्रपटांशी संबंधित अनेकानेक घटकांकडे पाहण्याची त्यांची मार्मिक आणि रसज्ञ वृत्ती वाचकांना आवडते. या सर्वांंविषयी लिहिताना ते अभ्यासपूर्ण तर लिहितातच, शिवाय वाचकांना उत्तम रसास्वाद कसा घेता येईल याकडेही कटाक्षाने पाहतात.

चित्रपटविषयक लिखाणास एक नवे वळण देणारे लेखक बाबू मोशाय यांच्या लेखनशैलीवर प्रसन्न असणाऱ्यांत अनेक साहित्यिक, चित्रपट दिग्दर्शक, नाटककार, संगीत अभ्यासक, राजकारणी वगैरेंचा समावेश आहे. बाबू मोशाय हे शैक्षणिक चित्रपट चळवळ व फिल्म सोसायटी चळवळ यांत कार्यशील राहिले आहेत. जुन्या ध्वनिमुद्रिकांच्या प्रसारार्थ चाललेल्या धडपडीशी त्यांचा संबंध आहे. बाबू मोशाय यांच्या चित्रपटविषयक लिखाणात राजकीय-सामाजिक भान प्रकट होते. त्यांच्या लिखाणास एक सांस्कृतिक परिणाम असून, साहित्यिक दर्जा आहे. म्हणूनच त्यांचे लेखन स्वतःचे असे व्यक्तिमत्त्व व शैली घेऊन येत असते.

बाबू मोशाय यांनी लिहिलेली चित्रपटविषयक आणि अन्य पुस्तके

[संपादन]
  • आपला अर्थसंकल्प (अर्थशास्त्रावरील पुस्तक)
  • आरपार
  • कंगालांचे अर्थशास्त्र (अर्थशास्त्रावरील पुस्तक)
  • खोया खोया चाँद
  • चांदरात
  • चित्राची गोष्ट
  • जलसाघर (हा शास्त्रीय, सुगम आणि नाट्य-चित्रपट संगीतावरील व त्यांचे संदर्भ असलेल्या विषयांवरील लेखसंग्रह)
  • डावपेच
  • `तारकांचे गाणे (स्त्री अभिनेत्रींवरील लेख )
  • नायिका
  • बॉम्बे टॉकीज
  • बोई बंगाल (बोइ बंगाल’मध्ये बिमल राय, सत्यजित राय, हरींद्रनाथ चटोपाध्याय प्रभृतींवरील लेख). या पुस्तकाला १९९५-९६चा महाराष्ट्र शासनाचा वाङ्‌मय पुरस्कार मिळाला आहे.
  • विदूषक (सिनेनटांची व्यक्तिचित्रणे)
  • शहेनशहा अमिताभ
  • सण्डे के सण्डे (देशी-विदेशी चित्रपट व कलावंत आणि या उद्योगाचे सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न यांचा वेध घेणारे पुस्तक. महाराष्ट्र टाइम्समध्ये पूर्वप्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)
  • सारथी
  • सुहाना सफर (चित्रपट संगीताविषयी)