Jump to content

वडगाव निंबाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वडगाव निंबाळकरहे गाव नीरा नदी काठी पासून तीन किलोमीटर उत्तरेकडे प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेले गाव म्हणून ओळखले जाते या गावांमध्ये एक जुना ऐतिहासिक राजवाडा आहे तसेच पांडव कालीन मंदिरे असल्याचे दिसून येते या गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आहेत. हे गाव निरा(पुरंदर) पासून पूर्वेकडे व बारामती पासून पश्चिमेकडे मध्यवर्ती ठिकाणी वसलेले गाव आहे. वडगाव निंबाळकर गावाची लोकसंख्या अंदाजे १० ते १२ हजार आहे. २०११ सालच्या सर्वेक्षणानुसार गावची लोकसंख्या ही ७६४६ ईतकी होती. वडगाव निंबाळकरचे क्षेत्रफळ १७०१.४७ हेक्टर आहे. वडगाव निंबाळकर मध्ये सुसज्ज बाजारपेठ आहे वडगाव निंबाळकर मध्ये सराफा बाजार पेठ आहे गावामध्ये महाराष्ट्र बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सर्कल ऑफिस, तलाठी ऑफिस, ग्रामपंचायत ऑफिस, सिटी सर्वे ऑफिस, 'अ' श्रेणीचे पशुवैद्यकीय दवाखाना आहे तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. वडगाव निंबाळकर मध्ये'अ'श्रेणीचे सुसज्ज संगणीकृत पोलीस स्टेशन आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत 68 गावांचा समावेश होतो. संपूर्ण संगणकीकृत असल्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणुन गौरविण्यात आले आहे. वडगावचा आठवडी बाजार रविवारी भरवला जातो.वडगाव निंबाळकर हे गाव संपूर्ण सुखसोयींनी समृद्ध असलेले बारामती तालुक्यातील हे पहिले गाव आहे. वडगाव निंबाळकर मध्ये असलेल्या राजवाडा मधुन भैरवनाथ मंदिरला जाण्यास भुयारी मार्ग होता असं म्हटलं जातं.

येथील शेतकरी हा प्रामुख्याने ऊस शेती करण्यामध्ये आनंदी असतो. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा कारखाना प्रामुख्याने वडगाव निंबाळकर मध्ये स्थापन करण्याचे योजले होते परंतु काही कारणास्तव तो कारखाना सोमेश्वर या ठिकाणी हलविण्यात आला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामुळे येथील शेतकरी हा सदन झाला असून बाजारपेठही उत्तम उदयास आली आहे.