पोरखेळ
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
पोरखेळ[१] : माया मोशन पिक्चर्स कृत मराठी चित्रपट. सदर चित्रपटाचे नुकतेच सेन्सॉर सर्टिफिकेशन झाले आहे. आता तो रिलीझच्या मार्गावरती आहे.
पोरखेळ : गोष्ट एका अनभिज्ञ अवलियाची
पोरखेळ चित्रपटात एका कलाकाराचं आयुष्य चित्रित केलं आहे. ज्याचे जगण्याचे स्वतःचे नियम आहेत. जो आपल्या नियम, वचनांसाठी आपले आयुष्यही पणाला लावू शकतो. अशा एका अनभिज्ञ कलाकाराची ही गोष्ट आहे. त्याच्या सुखाच्या, दुःखाचा, प्रेमाच्या, आयुष्याच्या संकल्पना अगदी स्पष्ट आहेत. तो पारदर्शक मनानं आपल्या कुटुंबासोबत त्यांच्यावर प्रेम करत जगतोय. अगदी सुखी नसलं तरी समाधानी आयुष्य आहे त्याचे. पण त्याच्या प्रामाणिक, निष्पाप वागण्यालाच त्याचे कुटुंब वैतागते. कारण चिखलातून चालताना पाय भरवायचे नाही म्हणले तरी ते भरतातच.
तो पुण्याला फ्री लान्सरचा जॉब करत त्याच्या कुटुंबासमवेत राहतोय. काही कारणांनी तो खचून जात पुणे कायमचे सोडून आपल्या गावी राहायला येतो. गावी त्याला त्याच्या कुटुंबाच्या असहकारामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागतो. तो गावीच साधे निरामय जीवन व्यतीत कार्याचे ठरवतो. पण जवळचेच लोक त्याला साधा आधारही न देता त्याच्याकडून केवळ व्यावहारिक अपेक्षा करतात. या मानसिक संघर्षादरम्यान त्याला स्वतःच स्वतःचा आधार बनावे लागते. कोलमडून पडलं तरी थरथरत्या पायांनी परत उभं राहावं लागतं.
त्याला या सर्व प्रवासात सोबत मिळते ती लहान मुलांची. आजूबाजूची, शेजारची चार लहान मुलं त्याच्या आयुष्यात ओल घेऊन येतात.
पोरखेळ : गोष्ट निर्मितीची
हा चित्रपट अक्षरशः अनंत अडचणी पार करत बनला आहे. कुठलाही गॉडफादर नसताना या सामान्य माणसांनी चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करण्याचे धाडस केले आहे. आणि पोरखेळ चित्रपट बनवून त्यांनी स्वतःची योग्यताही दाखवली आहे. चित्रपट जिद्दीने बनतो. पैशांनी नाही. जिद्द जी सारे अमंगल, सगळी संकटं धुडकावून लावत तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते.
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गाणी ही श्री. राजकुमार थोरात यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत : ऍड. के. एस. थोरात. या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक हे एका १० वर्षाच्या लहान मुलीने केले आहे. नोबल जाधव हिने चित्रपटातील शुभांगी नावाची भूमिका साकारत ही जबाबदारी पार पाडली आहे. याच्या कायदेशीर सल्लागार आहेत ऍड. शायनी जाधव.
पोरखेळ : गोष्ट पात्रांची
या चित्रपटातील पात्र ही ग्रामीण भागातील आहेत. त्यांची भाषा, राहणीमान अस्सल गावरान आहे. कास्टिंग कारतेवेळीच ग्रामीण कलाकारांची निवड झाली आहे. त्यामुळे ही एक ग्रामीण कथा आहे. यामध्ये सदर कलाकार, बार्बी, शुभांगी, अजिंक्य, आदित्य, प्रेमाकिरण, सरस्वती आणि कोमल ही मुख्य पात्रं आहेत. धुमधडाका फेम लोकप्रिय अभिनेत्री प्रेमाकिरण यांनी यातील गणिता या नावाची एक व्यक्तिरेखा साकारली आहे.
- ^ "पोरखेळ". https://www.mayamotionpictures.com/copy-of-events. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)[permanent dead link]