फया तानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


संरक्षण मंत्रालयासमोरील तोफ

फया तानी (मलयमधील सेरी पटानी) ही दक्षिण थायलंडमधील पट्टाणी प्रांतातील १७ व्या शतकातील घेराबंदी तोफा आहे. ही थायलंडमधील आता पर्यंतची सर्वात मोठी तोफ आहे जी २.७ मीटर लांब (९ फूट) आणि पितळेने बनलेली आहे. ही बँकॉकच्या ग्रँड पॅलेसच्या समोर, संरक्षण मंत्रालयाजवळ दर्शनी भागात ठेवली आहे. तोफ आजही पट्टाणी प्रांताचे प्रतीक समजली जाते.

इतिहास[संपादन]

१७ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात फया तानी घडवण्यात आली. ती पटानीच्या सल्तनतमध्ये टोकन कायान नावाच्या मूळच्या चायनीज शिल्पकाराने गह्डवली होती. सियामकडून येणाऱ्या हल्ल्याच्या अफवांना प्रतिसाद म्हणून सुलतान रतू बिरू यांनी ही शक्तिशाली तोफ बांधण्याचे आदेश दिले. त्यासाठी तीन तोफा बनवण्यात आल्या. दोन घेराबंदी तोफा सेरी पटानी आणि सेरी नेगारा. एक महालेला नावाची लहान तोफ बनवली होती.

इ.स. १७६७ मध्ये अयतुथाच्याचे पतन बर्मीज मुळे झाले. या वेळेस पट्टाणीच्या सल्तनाने सियामपासून फारकत घेतली आणि स्वातंत्र्य घोषित केले. अठरा वर्षानंतर, राजा राम प्रथम यांचे भाऊ, वाय-राजा बोर्न महा सुरसिंगानाट यांच्या नेतृत्वाखालील थाई सैन्याने आक्रमण केले आणि पटानीवर विजय मिळविला. त्यानंतर थाईंनी त्यावर राज्य केले. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://georgetownstreet.blogspot.com/2010/02/pattani-kingdom.html