Jump to content

चर्चा:रामचंद्र दत्तात्रेय रानडे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुलपति

[संपादन]

Mahitgar १४:१३, २२ जुलाई २००९ (UTC)

@Mahitgar: विदागारात मृत दुव्यांच्या आवृत्त्या मिळतात का ते शोधताना विदागारातून येथे आलो. पानाचा इतिहास पाहिल्यावर तुम्हीच >>अलाहाबाद विद्यापिठाचे कुलगुरूपदावरही होते.<< अशी माहिती टाकलेली दिसली विकिकरण करताना सदस्य:Sankalpdravid यांनीही तीच माहिती वापरली. माहितीही तुम्हीच टाकली आणि संदर्भ हवा साचाही तुम्हीच लावला. असो तुम्ही वर दिलेल्या मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती येथे सापडली आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:४५, २८ फेब्रुवारी २०१४ (IST)[reply]

@संतोष दहिवळ:

हम्म मराठी तत्त्वज्ञ हा विषय शोधता यांचे कडे लक्ष गेले आंतरजालीय मराठी संदर्भात " अलाहाबाद विद्यापिठाचे कुलगुरूपदावरही होते " असे आढळले होते. या अलाहाबाद विश्वविद्यापीठाच्या यादीत मात्र उल्लेख नाही असे लक्षात आले. www.allduniv.ac.in ला इमेल पाठवल्याचेही आठवते काही प्रतिसाद आला नाही. उपकुलगुरू किंवा रजीस्ट्रार किंवा इतर तत्सम पद असेल किंवा पदनामे काळाच्या ओघात बदलली गेली असतील असे काही होऊ शकते उल्लेख वगळला नाही संदर्भ हवा एवजी खात्री करून हवी असा काही साचा हवा.
राम गबालेंच्याबाबतही असेच काहीसे आहे. मराठी वृत्तपत्रात गांधी चित्रपटाचे दिग्दर्शनात सहभागी असा उल्लेख येतो गांधी चित्रपट अथवा पुरस्कार यादीत नामावली येते तरी त्यात राम गबालेंचे नाव नाही. अशा परिस्थितीत खात्री करून हवी असा साचा असावयास हवा असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३९, १ मार्च २०१४ (IST)[reply]

गुरुदेव रानडे समाधी ट्रस्ट, निंबाळ यांच्या अधिकृत संकेतस्थलावरील या दुव्यावर त्यांची १९४५ साली उपकुलगुरू पदावर नियुक्ती झाल्याचा उल्लेख आहे.मी गुरूदेवांची रामण्णा कुलकर्णी व ग.वि.तुळपुळे यांनी लिहिलेली चरित्रे पाहिली.त्यातही १९४५ ते १९४७ या काळात ते या पदावर असल्याची नोंद आहे. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:०४, १८ डिसेंबर २०१६ (IST)[reply]