आश्लेषा महाजन
आश्लेषा महाजन ह्या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत. वर्तमानपत्रांतून त्यांचे विविध विषयांवरील लेख आणि सदर लेखन सातत्याने प्रकाशित होत असते. इ.स. २००३-०४ या काळात आश्लेषा महाजन दैनिक लोकमतमध्ये 'मोकळं ढाकळं' हे साप्ताहिक सदर लिहीत होत्या.
पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन यांचा सहभाग होता. हा कार्यक्रम ३० जुलै २०१८ रोजी झाला होता.
आश्लेषा महाजन यांची पुस्तके
[संपादन]- अंकुरलेले गीत नवे (बालकुमार कविता)
- अतिदूरचे बांधव (अनुवादित, मूळ लेखक - श्रीनिवास शारंगपाणी)
- अभिवाचन: एक कला (संपादित पुस्तक)
- एकदम सही (कुमार कथासंग्रह)
- एक पानी आरस्पानी भाग - १, २ (१५४ + १५४ ललित लेख; सदरलेखन संग्रह)
- कळ्यांचे ऋतू (वयात आलेल्या मुलींच्या १५ कथांचा संग्रह)
- कार्टून कार्टी (बाल-कुमारांसाठी मजेदार लेखांचे पुस्तक)
- किड्यांशी मैत्री करू चला (बालकुमार कविता)
- गप्पूला नाचता येईना (‘प्रथम बुक्स’ कंपनीचे अनुवादित बालसाहित्य, मूळ लेखिका - मेनका रामन)
- गाणी बारा महिन्यांची (बालकुमार कविता)
- घरचे-दारचे सवंगडी (बालकुमार कविता)
- चित्रांचा खेळ (‘प्रथम बुक्स’ कंपनीचे अनुवादित बालसाहित्य, मूळ लेखक - अनिता मूर्ती)
- जादूची कवळी (बाल-कुमारांसाठी मजेदार कथेची पुस्तिका)
- टाईम प्लीजऽऽ (बाल-कुमार कथासंग्रह)
- द डेथ ऑफ अ मॅड मॅथेमॅटिशिअन ह्या तीन अंकी नाटकाचा मराठी अनुवाद. पुणे आकाशवाणीसाठी.(मूळ लेखक - श्रीनिवास शारंगपाणी)
- नंदिनी कुठे आहे? (‘प्रथम बुक्स’ कंपनीचे अनुवादित बालसाहित्य, मूळ लेखिका - अनिता मूर्ती)
- पपेष्टु पपेष्टु गाणे म्हण (बालकुमार कविता)
- परिसरातील गाणी (बालकुमार कविता)
- ‘प्रथम बुक्स’ कंपनीची बालकुमारांसाठी अन्य अनुवादित पुस्तके- काका आणि मुन्नी, भुताच्या गोष्टी, आंबा पडला ठप्प, बोमाक्काची बाहुली, इयादचे कबूतर, कराकरा कराकरा, मुलगा आणि त्याचे ढोलके, आकाशातील व्हेल इत्यादी.
- बोलू आनंदे- (बोलावे कसे? याबद्दलचे पुस्तक)
- मध्यस्थ -(कथासंग्रह)
- मनभावन (कवितासंग्रह)
- माझ्या कुत्र्याच्या छत्र्या- (विनोदी लेख संग्रह)
- मित्रा, सांगते 'आपली'च गोष्ट (स्त्री-पुरुष नात्याविषयीचे ललित-वैचारिक पुस्तक)
- मी काय करू? (बालक-पालकांसाठी कादंबरिका)
- रक्तचंदन (कवितासंग्रह)
- रुजवाई (ललित, वैचारिक लेखसंग्रह)
- शब्दपल्लवी (कवितासंग्रह)
- संस्कारगीते (बालकुमार कविता)
- School दुनिया : शाळेच्या कविता, धमाल Songs (मराठी व इंग्लिश बालकविता; सहलेखक - श्रीनिवास शारंगपाणी)
- स्वप्नजा स्वप्नाळू (बाल-कुमारांसाठी मजेदार लेखांचे पुस्तक.)
- स्वसंवेद्य (कवितासंग्रह)
- हृदयांतरीच्या कथा- (कथासंग्रह)
आश्लेषा महाजन यांना मिळालेल्या संधी, कार्यसिद्धी, सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]- इयत्ता सातवीच्या व दहावीच्या पाठ्यपुस्तकांत कवितांचा समावेश.
- विविध ध्वनिफितींसाठी गीतलेखन, शीर्षकगीते, पुणे आकाशवाणीच्या स्वरचित्र' कार्यक्रमात आश्लेषा महाजन यांच्या गीताचा समावेश झाला आहे.
- कळ्यांचे ऋतू ह्या पुस्तकाचे 'विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ'साठी क्रमश: अभिवाचन केले आहे.
- रविवार लोकमत, लोकसत्तामध्ये सदरलेखन, पुस्तक परीक्षणे प्रकाशित.
- दर्जेदार दिवाळी अंकांत, मासिकांतून सातत्याने लेखन केले
- अनेक पुस्तकांसाठी प्रस्तावना लिहिल्या आहेत.
- छात्र प्रबोधन या मासिकाचे मानद संपादकत्व, ऑल इज वेल या पौगंडावस्थेविषयक अंकाचे संपादन.
- पंचवेध, आज भेटल्या कृष्णसख्या, अनवाणी ते कॅटवॉक, जन्मजाह्नवी, तरिही वसंत फुलतो इ. स्वलिखित कार्यक्रमांची निर्मिती
- विविध संस्थांमधून काव्यवाचन/गायनाचे कार्यक्रम केले; कवितांच्या व कथांच्या कार्यशाळा घेतल्या/व्याख्याने दिली.
- चित्रकला, वारली चित्रकला, ग्लास पेंटिंग, अश्मशिल्पे बनवण्याचा छंद जोपासला.
सन्मान आणि पुरस्कार-
[संपादन]परिसरातील गाणी पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार/ उत्कृष्ट ललित लेखनासाठी लोकमत पुरस्कार/ अ. भा. बालकुमार साहित्य संमेलनाचे आनंदयात्रा पुरस्कार दोन वेळा/ मित्रा, सांगते आपलीच गोष्ट या पुस्तकास पुणे नगर वाचन मंदिराचा श्री.ना. बनहट्टी पुरस्कार/ मनभावन या पुस्तकास मराठी वाङ्मय परिषद, बडोदे यांचा अभिरुची गौरव पुरस्कार,/ पुणे मराठी ग्रंथालयाचा न.चिं. केळकर पुरस्कार,/ एकूण बालकुमार साहित्यासाठी शैलजा काळे पुरस्कार,/ कवितेतील योगदानासाठी शांता-गोविंद' पुरस्कार/२०१९चा श्रीनिवास विष्णू रायते गुरुजी राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार/ महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा श्रीनिवास रायते गुरुजी राज्यस्तरीय बालसाहित्यिक पुरस्कार, इत्यादी.
- आश्लेषा महाजन ह्या पिंपरी (ता.कोरेगांव, जिल्हा सातारा) येथे १४ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या ४थ्या रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.