Jump to content

लैंगिक कल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लैंगिक कल म्हणजे, एखाद्या व्यक्तिचे विषमलिंगी व्यक्तीबद्दल किंवा समलिंगी व्यक्तीबद्दल किंवा दोन्हींही व्यक्तींबद्दल वाटत असलेल्या भावनिक आणि/किंवा लैंगिक आकर्षणाचा संग्रह होय. समलैंगिककता, विषमलैंगिकता, उभयलिंगी लैंगिकता हे लैंगिक कलाचे काही प्रकार आहेत.[][] शिवाय, अलैंगिकता हा ही एक प्रकार आहे ज्यामध्ये कसल्याही प्रकारचे लैंगिक आकर्षण कोणत्याच लिंगाच्या किंवा लिंगभावाच्या व्यक्तिबरोबर वाटत नाही.[][]

लैंगिक कल आणि इतर समान संकल्पना

[संपादन]

लैंगिक कलाच्या ह्या वर्गीकरणांमधे लैंगिक अस्मितांविषयी आणखी विस्तृत अशी संकल्पनात्मक मांडणी आहे.[] जसे की, काही व्यक्ती स्वतःला सर्वलैंगिक(पॅनसेक्स्युयल) किंवा अनेकलैंगिक(पॉलीसेक्सुयल) म्हणून ओळख सांगतील[] किंवा तसे करणारही नाहीत.[] अमेरिकन मानसशास्त्र परिषदेच्या मतानूसार, लैंगिक कल म्हणजे, व्यक्तिच्या स्वतःला असलेल्या लैंगिक आकर्षणाच्या प्रकारावर त्याबद्दलच्या वर्तनावर आणि ते कोणत्या समुदायाचा समाजाचा भाग आहेत यावर आधारित अस्मितेवर/ओळखीवर आधारीत स्व: ची कल्पना होय. [][] एंड्रोफिलीया आणि गायनोफिलीया ह्या संकल्पना वर्तनअभ्यास शास्त्रामध्ये व्यक्तीच्या लिंगावर आधारीत लैंगिक कलाच्या व्याख्येला म्हणजेच समलिंगी/विषमलिंगी यांना पर्याय म्हणून वापरल्या जातात, कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीच्या पुरुषांप्रती असलेल्या आकर्षणाला एंड्रोफिलीया म्हणले जाते तर स्त्रीयांप्रती असलेल्या लैंगिक आकर्षणाला गायनोफिलीया म्हणतात.[] लैंगिक प्राधान्ये आणि लैंगिक कल ह्या दोन्हींही संकल्पना सामान्यपणे एकाच अर्थाने वापरल्या जातात परंतु मानसशास्त्रीय संशोधनांमध्ये मात्र या दोन्हींही संकल्पना वेगळ्या अर्थाने वापरतात.[] लैंगिक प्राधान्ये म्हणजे एखादा उभयलिंगी लैंगिक कल असलेल्या व्यक्तीने एका लिंगाच्या व्यक्तीपेक्षा दुसऱ्या लिंगाच्या व्यक्तीला जास्त प्राधान्य देणे म्हणजेच लैंगिक प्राधान्य होय.[][१०] लैंगिक प्राध्यान्य हे व्यक्तीच्या लैंगिक निवडीबद्दलचे आहे,[११][१२][१३] त्याच्याच तुलनेत वैज्ञानिक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झालेले आहे की, लैंगिक कल(सेक्सुयल ओरियेंटशन) ही निवड नसून ती न बदलण्याच्या पातळीवर व्यक्तीच्या अस्मितेत घडत गेलेली स्थीर बाब आहे.[१४][१५][१६]

लैंगिक कलाची जडण-घडण

[संपादन]

अनेक अभ्यास झालेले असतानाही शास्त्रज्ञांना लैंगिक कल नक्की कसा निर्माण होतो याचे कोडे पूर्णपणे उमगलेले नाही. तरीही लैंगिक कल घडवण्यामधे जनुकीय, संप्रेरके आणि सामाजिक संदर्भांच्या घटकांचा एकत्रित परिणाम होत असतो.[१४][१६][१७] अनेक शास्त्रज्ञ जीवशास्त्रीय अभ्यासांना केंद्रस्थानी ठेवून विचार करतात,[१४] त्यामुळे ते फक्त जनुकीय घडामोडी, आईच्या पोटात बाळ असतानाच्या आईच्या मानसिक-शारीरिक आंदोलनांचे तिच्या आसपासच्या परिसराचे, किंवा कधी-कधी इतर सामाजिक घडामोडींचा विचारही या शास्त्रज्ञांनी केलेला आहे.[१८][१९] बाळ जन्माला आल्या नंतर त्याच्यावर त्याच्या आसपासच्या वातावरणाचा परिणाम होण्याबद्दल खुप कमी शास्त्रीय पुरावे सापडतात.[२०] मुलांच्या बालपणातील व वाढीच्या वयातील अनुभवांचा किंवा पालकांच्या काही कृतींचा परिणाम मुलांचा लैंगिक कल घडवण्यात सहभागी असतो असे सिद्ध करणारे पुरावे सापडत नाहीत.[१८] लैंगिक कलाचे अस्तित्त्व हे संख्यारेषेसारखेच असते,ज्यामध्ये कमी लैंगिक आकर्षणापासून अगदी पुर्णपणे आकर्षीत होणे अशा वेगवेगळ्या छटा असलेल्या दिसतात.[२१]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d "Sexual orientation, homosexuality and bisexuality". रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-08-08. 2018-11-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Sexual Orientation". 2011-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-28 रोजी पाहिले.
  3. ^ Melby, Todd (November 2005). "Asexuality gets more attention, but is it a sexual orientation?". Contemporary Sexuality. 39 (11): 1, 4–5.
  4. ^ Marshall Cavendish Corporation, ed. (2009). "Asexuality". Sex and Society. 2. Marshall Cavendish. pp. 82–83. ISBN 978-0-7614-7905-5. February 2, 2013 रोजी पाहिले.
  5. ^ Alison., Goodman, (2008). Eon : Dragoneye reborn. Viking. ISBN 9780670062270. OCLC 183265703.CS1 maint: extra punctuation (link)
  6. ^ Firestein, Beth A. (2007). Becoming Visible: Counseling Bisexuals Across the Lifespan. Columbia University Press. p. 9. ISBN 978-0231137249. October 3, 2012 रोजी पाहिले.
  7. ^ "APPLICATION FOR LE AVE TO FILE BRIEF AMICI CURIAE IN SUPPORT OF THE PARTIES CH ALLENGING THE MARRIAGE EXCLUSION, AND BRIEF AMICI CURIAE OF THE AMERICAN PSYCHOLOGICAL ASSOCIATION, CALIFORNIA PSYCHOLOGICAL ASSOCIATIO N, AMERICAN PSYCHIATRIC ASSOCIATION, NATIONAL AS SOCIATION OF SOCIAL WORKERS, AND NATIONAL ASSOCIATION OF SOCIAL WORKERS, CALIFORNIA CHAP TER IN SUPPORT OF THE PARTIES CHALLENG ING THE MARRIAGE EXCLUSION" (PDF). Page 33 n. 60 (p. 55 per Adobe Acrobat Reader);citation per id., Brief, p. 6 n. 4 (p. 28 per Adobe Acrobat Reader). line feed character in |title= at position 19 (सहाय्य)CS1 maint: others (link)
  8. ^ Schmidt J (2010). Migrating Genders: Westernisation, Migration, and Samoan Fa'afafine, p. 45 Ashgate Publishing, Ltd.,
  9. ^ Rosario, M.; Schrimshaw, E.; Hunter, J.; Braun, L. (2006). "Sexual identity development among lesbian, gay, and bisexual youths: Consistency and change over time". Journal of Sex Research. 43 (1): 46–58. doi:10.1080/00224490609552298. PMC 3215279. PMID 16817067.
  10. ^ Rosario, Margaret; Schrimshaw, Eric W.; Hunter, Joyce; Braun, Lisa (2006-2). "Sexual Identity Development among Gay, Lesbian, and Bisexual Youths: Consistency and Change Over Time". Journal of sex research. 43 (1): 46–58. doi:10.1080/00224490609552298. ISSN 0022-4499. PMC 3215279. PMID 16817067. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: PMC format (link)
  11. ^ . American Psychological Association. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  12. ^ Friedman, Lawrence Meir (1990). The republic of choice: law, authority, and culture. Harvard University Press. p. 92. ISBN 978-0-674-76260-2. 8 January 2012 रोजी पाहिले.
  13. ^ Heuer, Gottfried (2011). Sexual revolutions: psychoanalysis, history and the father. Taylor & Francis. p. 49. ISBN 978-0-415-57043-5. 8 January 2011 रोजी पाहिले.
  14. ^ a b c Frankowski BL; American Academy of Pediatrics Committee on Adolescence (June 2004). "Sexual orientation and adolescents". Pediatrics. 113 (6): 1827–32. doi:10.1542/peds.113.6.1827. PMID 15173519.
  15. ^ Gloria Kersey-Matusiak (2012). Delivering Culturally Competent Nursing Care. Springer Publishing Company. p. 169. ISBN 978-0826193810. February 10, 2016 रोजी पाहिले. Most health and mental health organizations do not view sexual orientation as a 'choice.'
  16. ^ a b Lamanna, Mary Ann; Riedmann, Agnes; Stewart, Susan D (2014). Marriages, Families, and Relationships: Making Choices in a Diverse Society. Cengage Learning. p. 82. ISBN 978-1305176898. February 11, 2016 रोजी पाहिले. The reason some individuals develop a gay sexual identity has not been definitively established  – nor do we yet understand the development of heterosexuality. The American Psychological Association (APA) takes the position that a variety of factors impact a person's sexuality. The most recent literature from the APA says that sexual orientation is not a choice that can be changed at will, and that sexual orientation is most likely the result of a complex interaction of environmental, cognitive and biological factors...is shaped at an early age...[and evidence suggests] biological, including genetic or inborn hormonal factors, play a significant role in a person's sexuality (American Psychological Association 2010).
  17. ^ Gail Wiscarz Stuart (2014). Principles and Practice of Psychiatric Nursing. Elsevier Health Sciences. p. 502. ISBN 978-0323294126. February 11, 2016 रोजी पाहिले. No conclusive evidence supports any one specific cause of homosexuality; however, most researchers agree that biological and social factors influence the development of sexual orientation.
  18. ^ a b http://www.rcpsych.ac.uk/workinpsychiatry/specialinterestgroups/gaylesbian/submissiontothecofe/psychiatryandlgbpeople.aspx#history. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ Långström, N.; Rahman, Q.; Carlström, E.; Lichtenstein, P. (2008). "Genetic and Environmental Effects on Same-sex Sexual Behavior: A Population Study of Twins in Sweden". Archives of Sexual Behavior. 39 (1): 75–80. doi:10.1007/s10508-008-9386-1. PMID 18536986.
  20. ^ Bailey JM, Vasey PL, Diamond LM, Breedlove SM, Vilain E, Epprecht M (2016). "Sexual Orientation, Controversy, and Science". Psychological Science in the Public Interest. 17 (21): 45–101. doi:10.1177/1529100616637616. PMID 27113562.
  21. ^ http://www.apa.org/helpcenter/sexual-orientation.aspx. Unknown parameter |archive-दुवा= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)