Jump to content

धूम्रपान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्व साधारणपणे धुम्रपान म्हणजे धूर आत ओढणे असा होतो. सध्या धुम्रपान करण्यासाठी अनेक पदार्थांचा वापर केला जातो, उदा. तंबाकू, अफिम आणि इतर नशा देणाऱ्या पदार्थाचा ही वापर केला जातो.आज धुम्रपान करण्यासाठी सिगारेट, चिलीम (गांजा), बिडी, पाईप, हुक्का या पद्धतीचा वापर केला जातो.नाश करण्यासाठी धुम्रपान केले जाते. हे कधी फॅशन, कधी मज्जा, कधी टेन्शन आहे म्हणून तर कधी मित्रांसोबत अनेक जन धुम्रपान करत असतात. धुम्रपान केल्याने त्या व्यक्तीस थोडेसे उत्तेजित किंवा आनंदी झाल्यासारखे वाटते. याचामागील शास्त्रीय कारण असे की तंबाखू मधील निकोटीन हा पदार्थ आपल्या शरीरातील डोपामिन वाढवतो यामुळे धुम्रपान करणारी व्यक्ती आनंदी आणि उत्साही होते.पुरुषा प्रमाणेच महिलाही धूम्रपान करत असतात.

धुम्रपान

धुम्रपानाचे दुष्परिणाम

[संपादन]
  1. धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर होते.
  2. धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते.
  3. ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो.
  4. ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्‍यता वाढते, किंवा मूल कमी वजनाचे होते, किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात, किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो.
  5. धूम्रपानाचा गंभीर परिणाम हा आपल्या फुफ्फुसांवर होत असतो त्यामुळे धुम्रपानामुळे ९० टक्के लंग्ज कॅन्सर चे रुग्ण निर्माण होतात.
  6. सततच्या धुम्रपानामुळे प्रजनन संस्थेवर विपरीत परीणाम उद्भवतात.
  7. उच्च रक्तदाब तसेच शरीरातील रक्तप्रवाह कमी जास्त हे त्रास व्हायला लागतात.

सार्वजनिक धूम्रपानावरील बंदी

[संपादन]

२००१ मध्ये, मुरली देवडा यांनी सर्वोच्च न्यायालयातील एक ऐतिहासिक खटला जिंकला ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली गेली. त्या वेळी वैधानिक तरतुदी नसताना, न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी जसे की सभागृह, रुग्णालयाच्या इमारती, आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, न्यायालयीन इमारती, सार्वजनिक कार्यालये आणि रेल्वेसह सार्वजनिक वाहने या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई केली.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Environment and Health by Adv. Vijay Hiremath on Page 116" (PDF). 23 सप्टेंबर 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 1 जून 2014 रोजी पाहिले.

http://mr.vikaspedia.in/health/93094b917-935-90691c93e930/93893e92e93e92894d92f-93892e93894d92f93e/92490292c93e91694291a94d200d92f93e-93894793592893e91a947-92694193794d92a93093f92393e92e