रूपा कुडवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रूपा कुडवा या ओमिडयार नेटवर्क इंडिया ॲडव्हायझर्स आणि ओमिडयार नेटवर्क पार्टनर्सच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओमिडयार नेटवर्क ही अमेरिकेतील परोपकारार्थी गुंतवणुक करणारी संस्था आहे.[१]


२००७ मध्ये क्रिसिलच्या प्रमुख कार्यकारी अधिकारिपदी विराजमान झाल्यावर रूपा कडवा यांनी या फर्मचा महसूल तिपटीहून जास्त वाढवला, फर्मचा बाजारातला भांडवली हिस्सा (मार्केट कॅपिटलायझेशन) चौपट केला, आणि भारतातली एक रेटिंग एजन्सी ते डायव्हर्सिईफाड ग्लोबल ॲनालिटिकल कंपनी अशा क्रिसिलच्या वाटचालीचं नेतृत्व केलं. व्यावसायिक क्षेत्रातल्या सर्वात सामर्थ्यशाली स्त्रियांपैकी एक म्हणून त्यांचा गौरव झाला आहे (फॉर्म्युन इंडिया, २०११ ते २०१४)आणि आऊटस्टॅंडिंग बिझनेस लीडर ऑफ द इयर' (CNBC-TV18, इंडिया बिझनेस लीडर ॲवॉर्ड्स (IBLA २०१२)सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.[१]


व्यावसायिक जीवन[संपादन]

क्रिसिलमधल्या नोकरीचा भाग म्हणून रूपा स्वतःला भोवतीच्या परिस्थितीशी नेहमी जुळवून घेत राहिल्या. पॅरिसमध्ये स्टॅडर्ड अँड पूअर्ससोबत काम करत असताना फ्रेंच शिकण्यापासून, सौदी अरेबियामध्ये एका असाइनमेंटसाठी जाताना तिथली पारंपरिक वेषभूषा करण्यापर्यंत अनुकूलनाचा हा परीघ विस्तारलेला होता. अतिशय धावपळीच्या दिनचर्येतही रूपा आपली वाचनाची आवड (खरं तर ध्यास!) जपतात आणि फीटनेस आणि कुटुंबासाठीही वेळ काढतात. त्या म्हणतात, 'व्यक्तिगत आणि व्यावसायिक कामांमध्ये संतुलन राखण्याच्या गरजेबद्दल बोलताना नेहमी असा सूर आळवला जातो, की स्त्रियांना कुठल्यातरी एकाच गोष्टीची  निवड करावी लागते. पण, मी मात्र या दोन्ही गोष्टी करून आनंद मिळवते.[२]

२०१५ च्या एप्रिल महिन्यात क्रिसिलमधली २२ वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर रूपा यांनी ओमिड्यार नेटवर्क (ON)ची पार्टनर म्हणून नवी असाइनमेंट स्वीकारली. शिवाय ओमिड्यार नेटवर्क इंडीयन ॲडव्हायजर्सच्या त्या मॅनेजिंग डायरेक्टरही झाल्या. पिअर ओमिड्यार यांनी स्थापन केलेली ON ही फक्त परोपकारार्थ काम करणारी इनव्हेस्टमेंट फर्म आहे. लोकांना आपले जीवनमान सुधारता यावे, यासाठी निर्माण करण्याकरिता बाजारपेठेचं सामर्थ्य वाढवण्यासाठी ही फर्म कटिबद्ध आहे.[२]

हे ही पहा[संपादन]

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, अहमदाबाद

बाह्यदुवे[संपादन]

https://www.bloomberg.com/research/stocks/private/person.asp?personId=12931057&privcapId=11356122

hhindi.moneycontrol.com/news/market-news/focus-on-work-related-social-impact-roopa-kudva_148116.html

संदर्भ[संपादन]

  1. ^ Limited, Infosys. "Infosys - Roopa Kudva: Independent Director | Management Profiles". www.infosys.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Roopa Kudva | Omidyar Network". www.omidyar.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-11 रोजी पाहिले.