संजीवके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संजीवके म्हणजे वनस्पतीजन्य अथवा कृत्रिमरित्या तयार केलेली रसायने आहेत. याचा वापर वनस्पती अथवा पिकात योग्य वेळी योग्य ते फेरबदल घडवून आणण्यास होतो.याने बियाण्यांच्या अभिवृद्धीत दर्जात्मक व गुणात्मक वाढ होते.याचे योग्य प्रमाण वापरल्याने वनस्पतीची अथवा फळधारणेची वाढ थांबवणे, हळू करणे अथवा त्याची गती वाढविणे शक्य आहे. याचा उपयोग योग्य वेळी पिक उत्पादन येण्यास करता येतो.

क्रिया[संपादन]

ही संजीवके, वनस्पती अथवा एखाद्या पिकातील मूळ स्वरूपात अंतर्गतरित्याच असणाऱ्या रासायनिक द्रव्यांचा वापर करतात व आपली क्रिया घडवून आणतात.त्यामुळे आवश्यक तो परिणाम साधता येतो.वनस्पती अथवा पिकात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण, अन्नशोषण इत्यादी क्रियांमध्ये विशिष्ट स्वरूपात बदल घडविण्यात येतात. परिणामी, वनस्पतीत अथवा पिकात मूलतः असणाऱ्या पेशींची वाढ होते व त्यांची लांबी,रुंदी,जाडी इत्यादी वाढते.याचे योगाने वनस्पतीच्या पेशीमध्ये संख्यात्मक व आकारात्मक बदल घडतात.

संजीवके कोणती आहेत[संपादन]

  • ऑक्सिन गट - इंडोल ॲसिटिक ॲसिड(IAA), इंडोल ब्युट्यारिक ॲसिड(IBA),नॅपथॅलिन ॲसिटिक ॲसिड(NAA)
  • जिब्रेलीन गट - GA
  • सायटोकायनीन - कायनेटिन, जिएटिन इत्यादी.
  • वाढ रोधके - याने झाडांच्या खोडाची वाढ थांबते. - एम एम ओ१६१८, सायकोसिल, इत्यादी

वाढ निरोधके -..

इथिलीन - ethrel

फायदा[संपादन]

उत्पादनांपासून येणाऱ्या मिळकतीचा आलेख वरच्या पातळीवर राखण्यास मदत होते. उदारणार्थ: एखाद्या शेती उत्पादनाचा कालावधी, उत्पादन सुरू झाल्यापासून (हंगाम)२ महिने आहे असे समजले तर, साधारणतः असे आढळून येते कि, पिक अथवा फळभाज्या बाजारात नुकत्याच येण्यास सुरुवात झाल्यास (पुरवठा कमी असल्यामुळे) त्याचा भाव हा चढा असतो. नेमके त्याच वेळी शेतीचे उत्पादन बाजारात आल्यास चांगली कमाई होते. साधारण १ महिन्याने (पुरवठा भरपूर होत असल्यामुळे), त्या शेतमालाचे भाव पडतात.त्यास न्युनतम भाव मिळतो. ते उत्पादन येणे संपत आल्यावर शेवटी-शेवटी पुन्हा पुरवठा कमी होतो व भाव थोडे वाढतात.

संजीवकांमुळे आपले पिक कधी बाजारात यावे याचे नियोजन करणे शेतकऱ्यास शक्य होते.त्यामुळे त्याचे उत्पन्न वाढते.

परिणाम[संपादन]

मानवी जीवनावर अशी संजीवके दिलेली शेतीउत्पादने खाण्याने काय परिणाम होतात हे अद्याप अज्ञात आहे अथवा त्यास व्यापक प्रसिद्धी मिळाली नाही.

संदर्भ[संपादन]

  • तरुण भारत वर्तमानपत्र दिनांक ५ सप्टें. २०१८, कृषी भारत पुरवणी,पान क्र. ८, -मथळा-रोपवाटीकेत व फळबागेत संजीवकांचा उपयोग.लेखक: डॉ. प्रिया गावंडे, डॉ. उज्जवल राऊत, डॉ. देवानंद पंचभाई, उद्यानविद्या विभाग, पंदेकृवि, अकोला.