इन्फोसिस फाउंडेशन
ही समाजातील विविध स्तरातील लोकांच्या विकासासाठी कार्यरत असणारी सामाजिक संस्था आहे. समाजातील ज्या स्तरात सुविधा सहसा उपलब्ध होत नाहीत अशा गटांना सहकार्य करून त्यांचा विकास करणे यासाठी ही संस्था प्रयत्न करते.[१] सुधा मूर्ती ह्या या संस्थेच्या सचिव आहेत.[२] अमेरिकेमध्ये इन्फोसिस फॉउंडेशन , यूएसए नावाची इन्फोसिस फाउंडेशनची एक शाखा आहे.[३]
स्थापना
[संपादन]सुधा मूर्ती या संस्थेच्या संस्थापक सदस्या आहेत. इ.स.१९९६ साली कर्नाटक राज्यातील बंगळुरू या शहरात या संस्थेची स्थापना झाली. इन्फोसिस ही भारतात दुसऱ्या क्रमांकाची आयटी कपंनी आहे. महसुलाच्या आधारे जगामध्ये ५९६ वा क्रमांक लागतो.[४] ३ एप्रिल २०२० रोजी त्यांचे बाजार भांडवल ३२.०५ अब्ज डॉलर्स होते.[५]
कार्यक्षेत्र
[संपादन]आरोग्य, शिक्षण, कला आणि संस्कृती तसेच ग्रामीण विकास या क्षेत्रात संस्थेचे योगदान आहे.[१] १२ हजार पेक्षा जास्त डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत आणि ३,७४७ कुष्ठरोग्यावर उपचार करण्यात आलेले आहेत .[६] कोरोना-१९ रुग्णांसाठी इन्फोसीस फॉउंडेशनने नारायण हेल्थ सिटी सह भागीदारी केली आहे, याद्वारे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांना मदत व्हावी असा उद्देश या फाउंडेशनचा आहे .[७]
शिक्षण
[संपादन]इन्फोसिस संस्थेने ग्रामीण भागातील शाळांना शिक्षण आणि ग्रंथालयाची सुविधा देण्यासाठी शाळांमध्ये भागीदारी केली [८]
संदर्भ
[संपादन]- ^ a b Limited, Infosys. "Infosys Foundation - Supporting Underprivileged Sections of Society". www.infosys.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-05 रोजी पाहिले.
- ^ "Infosys Foundation | Our Trustees - List and Profiles". www.infosys.com. 2020-03-29 रोजी पाहिले.
- ^ "Infosys Foundation USA". www.infosys.org. 2020-03-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-01 रोजी पाहिले.
- ^ "Global 2000 - The World's Largest Public Companies 2019". Forbes (इंग्रजी भाषेत). 2020-04-04 रोजी पाहिले.
- ^ "Infosys Market Cap | INFY". ycharts.com. 2020-04-04 रोजी पाहिले.
- ^ "Foundation Healthcare Initiatives, Grants and Programs | Infosys". www.infosys.com. 2020-03-29 रोजी पाहिले.
- ^ "Infosys Foundation partners with Narayana Health City to open quarantine facility for COVID-19 patients". The Economic Times. 2020-04-01. 2020-04-01 रोजी पाहिले.
- ^ "Infosys Foundation – Education Care Initiatives". www.infosys.com. 2020-04-01 रोजी पाहिले.