Jump to content

महानगरीय साहित्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक प्रगतीच्या झपाट्यात विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच जगभर महानगरी उभी राहीली. महानगर म्हणजे रोजगार मिळविण्याचे हमखास ठिकाण. या भावनेतून पारंपारिक व्यवसाय टाकून उपजिविकेसाठी खेड्या पाड्यातील वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळ्या जातीधर्माच्या , वेगवेगळ्या सांस्कृतिक रितिरिवाजाच्या लोक समुह महानगरात येऊन स्थलांतर झाला. कष्टकरी ओढाधी निरनिराळ्या आपत्तीमुळे स्वतःचा देश सोडून निरवाहीत परक्या भूमीत पाय रोऊ पाहणाऱ्या निर्वासीत लोकांच्या भिन्न भिन्न जीवन शैलीचा संकरातून महानगरीय जीवनाचे स्वतःचे असे परंपरा व चालीरीती आणि स्वतःचे असे वर्तन बंध तयार झाले. महानगरातील लोकसमुह अनेक रूपी आणि अनेक स्थरीय आहे. या सर्वांचेच चित्रण ज्या साहित्यात येते त्यास महानगरीय साहीत्य असे म्हणतात. या महानगरीय साहित्याचा उगम १९६० नंतर इतर प्रवाहांसोबत झालेला आढळतो.

महानगरीय साहित्याची व्याप्ती आणि विकास

           महानगरीय जीवनाची विदारकता यंत्रयुगीन समाज आणि मध्यम वर्गीयांचे कीरटे जीवन मर्ढेकरांच्या कवितेत पहिल्यांदा प्रकट झाले. उद्योगप्रधान अर्थकेंद्रीत 

संस्कृतीपासून दूर असलेल्या पर्यावरणातील लेखक जेव्हा आधुनिक जीवनपद्धतीला सामोरा जातो. तेव्हा पारंपारिक संस्कारांनी घडलेली त्याची मानसिकता आणि आधुनिक जीवन पद्धती यांच्यातील मोठे अंतर त्याला जाणवते. नव्या व्यवस्थेशी नीट जुळवून न घेता आल्याने स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. अशा कुंचबळेमुळे आणि न्युनगंडामुळे या लेखखापुढे एक प्रकारचा Identity Crisis उभा राहतो. मर्ढेकरोत्तर कालखंडात लिहीली गेलेली महानगरीय कविता अशा Identity Crisis मधून पुढे आलेली आहे.

महानगरीय कवितेत अशा प्रकारची अस्तित्त्व संघर्षाची भावना दिसून येते काय.

            १९६० च्या आसपासची पिढी सर्वच बाबतीत असंतुष्ट असमाधानी होती. शहर अमर्याद वाढत चालली होती आणि खेडी बकाल होत होती. समाज सामान्य माणसाने

व्यक्ती म्हणून मूल्य हरवलेले होते. व्यक्ती -व्यक्तितला विसंवाद वाढत होता. अधिकारावर असेलल्या काही थोड्याशा व्यक्तींचा वर्ग सोडल्यास बहुसंख्य माणसांना असहाय्य, परात्म, निराश आणि वैफल्यग्रस्त आयुष्य जगावे लागत होते. अशा या जगण्याचे वास्तव चित्रण राजकीय, सामाजिक, सास्कृतिक स्तरांवर प्रतिबिंबित होत नव्हते. सर्वच बाबतीत असंतुष्ट असमाधानी असणाऱ्या या पीढीला सर्वच क्षेत्रातील प्रस्थापितता खुपत होती. या असंतोषातून साहित्यक्षेत्रातील लघुनियतकालिकांची चळवळ एकणीसशे साठच्या आसपास जोमाने पुढे आली. या लघुनियतकालिकांनी पारंपारिक जीवन दृष्टीला आणि वाङमयीन संकेतांना विरोध केला. आपल्या नावातून, आकारातून, मांडणीतून आणि लेखनातून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात चळवळ उभी करण्यात प्रयत्न केला.

            अरुण कोल्हटकर, दिलीप चित्रे, मनोहर ओक, तुळशी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर, नामदेव ढसाळ, सतीळ काळसेकर, वसंत आबाजी डहाके हे कवी लघुनियत 

कालिकांच्या चळवळीतून पुढे आलेले कवी आहेत. या कविंच्या कवितेत महानगरीय समाजव्यवस्थेचे भयावह रूप उघडे करून दाखविणारे महानगरीय संवेदन प्रकट झाले आहे. अशाप्रकारे महानगरातील विविध स्वरूपातील अवकाश घेऊन महानगरीय साहित्य अवतरले आहे. पण आज ही एक सक्षम साहबीत्य प्रवाह म्हणून ज्या प्रमाणे दलित साहित्य बोली भाषेतील साहित्य, ग्रामिण साहित्य या प्रवाहांचा ्विकास व्यापक स्वरूपांचा झाला त्या प्रमाणे तो महानगरीय साहित्याच्या संदर्भात आढळत नाही.

        अर्थात याची कारणे शोधतात ती महानगरीय जीवनाच्या चक्रातच सापडतात महानगराचे आयुष्य धकाधकीचे आहे. जीवन धावपळीचे आहे. समाजाचे अकलन करण्यास 

गट अत्यांत अल्प असून त्यातही बहतांशी लोक महानगरीय नाळेसोबत अत्मयतीने जोडले गेलेले नाहीत. परिणामी महानगरीय साहीत्याच्या चित्रणात काही गोष्टीच्या मर्यादापडतात. महानगरीयसाहित्यामुळे मुल्यविशेष घऊन साहित्य प्रकटन नाही. आणि जरी ते प्रकटले तरी ते प्रभावी पणए साकारलेले नसते.

              या संदर्भात भाऊ पाध्ये यांचा उल्लेख  महानगरीय साहीत्याचे सम्राट म्हणून करावा लागेल. कारण खऱ्या अर्थाने त्यांनी महानगरीय साहीत्याच्या विकासात मोलाची

भर घातली आहे. अन्य साहित्तीकांचे साहीत्य उपलब्ध असले तरी भाऊ पाध्ये यांच्या साहीत्यापुढे ते कमी प्रमाणात उपलब्ध असून फारसे प्रभावी असल्याचे आढळत नाही. नवसाहित्याच्या चळवळीत महानगरीय साहीत्य विकसीत होत असे तरी ही त्यात कृत्रीमपणा आणि इतर उणीवा आढळतात. तेव्हा खऱ्या अर्थाने महानगरीय साहीत्याच्या विकासासाठी पाऊल उचलणे तितकेच अपेक्षित आहे.