Jump to content

मुरगूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुरगूड हे महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील एक शहर आहे. येथे नगरपरिषद आहे. तुम्हाला माहिती आहे का कि मुरगूड गावाचं नाव मुरगूड असं का ठेवलं गेलं ? तर मुळात मुरगूड हा कन्नड शब्द आहे. मुर म्हणजे तीन आणि  गुड म्हणजे  डोंगर हे शहर (गाव) तीन पर्वतांनी वेढलेले आहे म्हणून त्याला मुरगूड असे नाव पडले. या शहराची लोकसंख्या ११,१९४ आहे. येथील जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. हे शहर कागलपासून २८ किमी अंतरावर आहे. येथे शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. सन १९२३ मध्ये शाहू महाराजांनी बांधलेला सरपिराजी तलाव हे येथील ऐतिहासिक स्थळ आहे.[] पिण्यासाठी आणि शेतीसाठी मुख्य पाण्याचे स्रोत म्हणजे सरपीराजीराव तलाव. हे मुरगूडच्या पूर्वेस वसलेले आहे. या तलावाची स्वतःची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मुरगूड परिसरातील प्रमुख पीक ऊस आहे, कारण वर्षभर तेथे पाणी उपलब्ध आहे. मुरगूडच्या जवळचे आदमापूर गाव तेथील संत बाळूमामा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "मुरगूडचा सरपिराजी तलाव भरला". महाराष्ट्र टाईम्स. ८ ऑगस्ट २०१४. १७ मार्च २०१८ रोजी पाहिले.[permanent dead link]