बंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाण्याचा बंब

ग्रामीण भागात आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी बंबाचा वापर केला जातो.हा एक प्रकारच्या अत्यंत छोट्या स्वरूपातील घरघुती बॉयलरच आहे. यात उष्णता वहनाचे तंत्र वापरण्यात आले असते.

स्वरूप[संपादन]

बंब हे शक्यतो तांबे, पितळेचे, स्टील किंवा ॲल्युमिनियमचे असतात.बंबाचे आकारमान २५ लिटर ते ५० लिटर पाणी मावेल एवढे असते.त्यास पाणी बाहेर काढण्यास एक तोटी असते.हा बंब ठेवण्यास सहसा आढणी वापरण्यात येते. त्याद्वारे गरम पाणी काढण्यासाठी त्याखाली बादली ठेवणे व नळकांड्यात साचलेली राख काढणे सोपे जाते.या बंबाच्या मध्यभागी एक मोठ्या आकाराचे नळकांडे तथा धुरांडे असते.त्यात जळणाचे पदार्थ टाकण्यात येतात.या नळकांड्याचे खालचे बाजूस एक काढता येण्याजोगी (सहसा बीड या धातूची) सच्छिद्र जाळी असते. त्यायोगे नळकांड्यात असणाऱ्या इंधनास प्राणवायू मिळत राहतो व ज्वलन सुरू राहते. त्या ज्वलनाद्वारे ते नळकांडे गरम होते.

या गरम झालेल्या नळकांड्यातील उष्णता, त्या नळकांड्याचे परिघाचे बाह्य भागास असणाऱ्या पाण्यात पोचते व ते पाणीपण गरम होते. गरम होते. याचे काम संपल्यावर यास बंद करावयाचे असेल तर त्याच्या नळकांड्याची वरची बाजू झाकण्यात येते. तसे केल्यावर, याचे नळकांड्यात प्राणवायूचे/हवेचे संचलन थांबते व त्यातील जळण विझते.

वापर[संपादन]

आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी बंबाचा वापर केला जातो.यात इंधन म्हणुन गोवरी व लाकूड फाटा वाळलेल्या तुराट्या, ज्वारीचा कडबा आदींचा उपयोग होतो.

फायदे[संपादन]

राहिलेले वाळके लाकूड व शेन वाया जात नाही.

तोटे[संपादन]

प्रदुषण होते.