Jump to content

महर्षी दयानंद सरस्वती वस्तू संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संग्रहालयाचा इतिहास

[संपादन]

हे संग्रहालय सोलापूर येथील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात आहे.या संग्रहालयाची स्थापना १२ जानेवारी २०१०मध्ये डॉ. सतीश कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन झाले .

  या वस्तुसंग्रहालयातील सर्व वस्तू मुर्ती,शिल्प, नाणी वीरगळ शस्त्रास्त्रे इत्यादींचा संग्रह इतिहास विभाग प्रमुख डॉ लता अकलूजकर प्रा. भा. इतिहास व संस्कृती विभाग प्रमुख प्रा. एम. एम. मस्के, प्रा. बी. आर. गायकवाड आणि डॉ. आर. एन. जाधव प्राचार्य डॉ श्रीनिवास वडगबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील विविध गावातून जमा करण्यात आल्या.
   महर्षी दयानंद सरस्वती वस्तुसंग्रहालयाचे नूतनीकरण सन २०१९ मध्ये दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानीय सचिव श्री.महेशजी चोप्रा ,प्राचार्य डॉ .विजयकुमार उबाळे, विभाग प्रमुख डॉ आर.एन. जाधव यांच्यामार्गदर्शनाखालीकरण्यातआले.संग्रहालयाच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी पुरातत्त्व आणि संग्रहालय विभाग, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ ,पुणे यांचे सहकार्य लाभले.
   संग्रहालयामध्ये विविध गावांमधून दगडी शिल्प, मूर्ती, वीरगळ आणि शिलालेख आणण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर सेवक श्री. सिद्राम बंडगर, श्री. रमेश निराळे, श्री. मारुती जाधव, श्री. मुरलीधर डोंबाळे, श्री. शिवराय हांडे, श्री. यादवराव होटकर आणि श्री. गुरुनाथ काळे यांचे सहकार्य लाभले.

दुर्मिळ वस्तूंचा संग्रह

[संपादन]

मोडी,फार्सी, उर्दू, देवनागरी, संस्कृत लिपी आणि भाषेतील दुर्मिळ हस्तलिखिते , विविध प्रकारचे वीरगळ, शस्त्रास्त्रे, नाणी, स्टॅम्प पेपर लोखंडी कुलूप,पानपात्र, पिकदाणी,पितळेची ,तांब्याची ,पंचधातुची भांडी, जुन्या काळातील वजने मापे,यांचा समावेश आहे

   संग्रहालयातील विविध वस्तूंचा संग्रह ज्यांनी भेट म्हणून दिला आहे त्यांची नावे डेक्कन कॉलेज, पुणे, श्री. किशोर  चंडक, श्री. शिवाजी नामदेव गायकवाड, श्री. गोडबोले वकील, श्री. निवृत्ती काशिनाथ गायकवाड, श्री. नितीन अणवेकर इत्यादी प्रमुख व्यक्तीं शिवाय अनेकांनी आपल्या संग्रहातील वस्तू या संग्रहालयासाठी भेट म्हणून दिल्या आहेत.

संग्रहालयातील दालने

[संपादन]

संग्रहालय दोन भागात विभागलेले आहे.अंतर्गत संग्रहालय आणि बाह्य संग्रहालय

अतर्गत संग्रहालय

[संपादन]

संग्रहालयातील या दालनामध्ये 22 दर्शिका पेट्या शोकेस आहेत यामध्ये अश्मयुग सिंधू संस्कृती आद्य ऐतिहासिक काळ मध्ययुग महाराष्ट्रातील आदिवासी भारतीय शिल्पकला मूर्तिकला मंदिरे किल्ले नाणी शस्त्रास्त्रे हस्तलिखिते कागदपत्रे सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन वैशिष्ट्ये सोलापूरचा मार्शल लाँ

बाह्य संग्रहालय

[संपादन]

बाह्य संग्रहालयामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या विविध गावांमधून आणलेल्या देवदेवतांच्या दगडी मूर्ती,शिल्प, शिलालेख,वीरगळ ठेवण्यात आले आहेत.

मान्यवरांच्या भेटी व अभिप्राय

[संपादन]

श्री.पूनम सूरी—अध्यक्ष, डी.ए.व्ही.कॉंलेज ट्रस्ट अँड मॅंनेजमेंट सोसायटी, नवी दिल्ली. श्री.महेश चोपरा , स्थानिय सचिव, दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर प्रा.डॉ.वसंत शिंदे,कुलगुरू,डेक्कन कॉलेज,पुणे डॉ.जयसिंगराव पवार,ज्येष्ठ इतिहास संशोधक,कोल्हापूर प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे,माजी अध्यक्ष,अ.म.इतिहास परि डॉ.प्रमोद दंडवते डेक्कन कॉलेज,पुणे डॉ.विजय साठे ,डेक्कन कॉलेज,पुणे डॉ.अवनीश पाटील,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर   डॉ.पंडित विद्यासागर स्वा.रा.ती.विद्यापीठ नांदेड डॉ. बालाजी गाजूल, पुरातत्त्व संग्रहालय, डेक्कन कॉलेज, पुणे डॉ. साबळे पी. एस., विभाग प्रमुख, पुरातत्त्वशास्त्र, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे

संग्रहालयाचे उपक्रम

[संपादन]

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी संग्रहालयास भेटीचे आयोजन करणे , अस्थायी वस्तू संग्रह प्रदर्शन भरवणे , आपला सांस्कृतिक वारसा जतन करणे व त्याचे संवर्धन करणे याविषयी विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जाणीव जागृती करणे

महर्षी दयानंद सरस्वती वस्तू संग्रहालय सोलापूर

संग्रहालयाची प्रकाशने

[संपादन]
  • वारकरी(इंंग्रजी)-लेेेखक,डॉ.सतीश कपूर
  • हिंदूइझम अँड आर्ट-सतीश कपूर
  • संशोधन पत्रिका,१९ वे अधिवेशन,अ.म.इतिहास परिषद,सोलापूर,२०१०

संदर्भ

[संपादन]

[] []

  1. ^ AIHC Mueum. "Department".
  2. ^ <"सामंजस्य करार ">दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय,सोलापूर आणि डेक्कन अभिमत विद्यापीठ ,पुणे यांच्यातील सामंजस्य करार