Jump to content

शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल हे देवगडमधील एक विद्यालय आहे. या विद्यालयाचे संचालन देवगड एज्युकेशन बोर्ड,मुंबईद्वारे केले जाते. या विद्यालयाची स्थापना १९१९ साली करण्यात आली. हे विद्यालय गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी बस स्थानकाजवळ आहे. या विद्यालयात बालवर्गापासून बारावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. विद्यालाय्च्या प्राथमिक विभागाचे नाव मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा असे आहे. विद्यालातर्फे दरवर्षी 'श्रीराम हस्तलिखित' असा एक अंक प्रकाशित केला जातो.

शाळेचा इतिहास

[संपादन]

ही शाळा सुरुवातीला 'श्रीराम इंग्लिश स्कूल ' या नावाने ओळखली जायची. पुढे शेठ मफतलाल यांनी दिलेल्या देणगीप्रीत्यर्थ शाळेचे नाव 'शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल' असे ठेवण्यात आले. शाळेची स्थापना ३ मार्च १९१९ साली झाली. दरवर्षी या दिवशी शाळेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. 'ज्ञानं शीलं तपो बलं' हे शाळेचे ब्रीद वाक्य आहे.

शाळेची वैशिट्ये

[संपादन]

या शाळेत क्रमिक अभ्यासासोबतच इतर कलांच्या जोपासनेसाठी विशेष विभाग चालवले जातात. शाळेचा संगीत विभाग 'संगीतायातन' या नावाने ओळखला जातो. माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून साकारलेला 'गुरुदक्षिणा प्रेक्षगृह' आणि 'अनंत स्मृती रंगमंच' शाळेच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहेत. शाळेला एक विस्तीर्ण क्रीडांगण लाभले आहे. संगणक विभाग, चित्रकला कक्ष यामुळे विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन प्राप्त होते. यासाठी अनुभवी शिक्षकवर्ग उपलब्ध आहे.