चर्चा:नव्याची पुनव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आश्विन पौर्णिमेला नव्याची पुनव म्हणतात, माघ पौर्णिमेला नाही. हा लेख पूर्णपणे काढून टाकावा.

लेखात पेंढ्या, पेंड्या आणि ताटे असे शब्द आहेत, या तिघांचा अर्थ अर्थ एकच ? .. (चर्चा) १६:५२, १० डिसेंबर २०१७ (IST)[reply]

लेखाचे एकत्रीकरण केले आहे.हा लेख काढण्यास हरकत नाही.तसेच जी माहिती मी संंपादित केली आहे त्याच्या पुस्तकाचा संंदर्भही दिला आहे तो पहावा. धन्यवाद !आर्या जोशी (चर्चा)

@आर्या जोशी: @:
नव्याची पुनव आश्विन पौर्णिमेला म्हणतात की माघ पौर्णिमेला हे ठरवून घ्या, कारण येथील माहिती कोणत्या लेखात स्थांनातरित करावी यासाठी हे आवश्यक आहे.

--संदेश हिवाळेचर्चा १४:०६, ११ डिसेंबर २०१७ (IST) साचा:साद।संंदेश हिवाळे तुमचा मुद्दा योग्य आहे तथापि मी जी पुस्तके अभ्यासली आहेत त्यात माघ पौर्णिमेचा उल्लेख सापडतो.आश्विन महिन्यातील कोजागरीचा संंदर्भ मला शोधताना या संंदर्भात मिळालेला नाही.आर्या जोशी (चर्चा) ---[reply]

महाराष्ट्र टाइम्समधील १८ ऑक्टोबर २०१३ रोजीचा लेख -

कोजागिरी.... वैभवाचा, आनंदाचा सण | Updated: Oct 18, 2013, 01:47PM IST


कोजागिरी.... वैभवाचा, आनंदाचा सण नवरात्रीनंतर पाच दिवसांनी येणारी पौर्णिमा शरद किंवा कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पावसाळा निरोप घेत असतो आणि हिवाळ्याची चाहूल लागलेली असते. शेतातील पिकं ऐन भरात आलेली असतात. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात म्हणूनच कोजागरीचं महत्त्व विशेष अधोरेखित होतं.

निळ्याशार नभांगणी टिपूर चांदण्याचा पडलेला सडा आणि त्यात पूर्ण चंद्रबिंब विराजमान झालेलं पाहण्याची आस कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकालाच लागलेली असते. घराच्या, इमारतीच्या गच्चीवर, अंगणात केशर आणि सुकामेवायुक्त आटीव दुधाचं पातेलं ठेवून चंद्रबिंब मध्यान्हास येईपर्यंत नाच-गाणं करत जागरण करायचं. मध्यान्ही आलेल्या चंद्रबिंब दुधात पाहायचं आणि सर्वानी आनंदाने त्या दुधाचं सेवन करत आई जगदंबा मातेचं चिंतन करत आपापल्या घरी जायचं, असा कोजागरीचा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. पूर्वी धार्मिक भावनेने साजरा केल्या जाणा-या या सणाला अलीकडे मनोरंजनात्मक स्वरूपही प्राप्त झालं आहे. आनंदाची देवाणघेवाण करण्याचा महत्त्वाचा सण म्हणून कोजागरीकडे पाहिलं जाऊ लागलं आहे.

नवरात्रीनंतर पाच दिवसांनी येणारी पौर्णिमा शरद किंवा कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पावसाळा निरोप घेत असतो आणि हिवाळ्याची चाहूल लागलेली असते. शेतातील पिकं ऐन भरात आलेली असतात. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. कोजागरीचा सण सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असला तरी त्याचा कोणताही ठळक उल्लेख पुराणात आढळत नाही. मात्र या सणाविषयीच्या काही दंतकथा प्रसिद्ध आहेत. महिषासूराशी नऊ दिवस युद्ध खेळून दमलेली देवी पुढे पाच दिवस आराम करते आणि पौर्णिमेला जागी होते. तेव्हा तिची पूजा करून असुरी संकटातून मुक्त केल्याबद्दल तिची स्तुती करून तिचा जागर मांडला जातो. संबळ आाणि झांजाच्या तालावर देवीचं गुणगाण असलेली गाणी गाऊन तिला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याच प्रथेला गोंधळ-जागरण असं म्हणतात.

कोजागरी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. गुजरातमध्ये या दिवशी रास-गरबा नृत्य करत देवीची स्तुती केली जाते, तर बंगालमध्ये या उत्सवाला 'लोख्खी पूजो' असं म्हणतात. तिथे या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तर मिथिला नगरीत 'कोजागरहा पूजा' केली जाते. या दिवशी अनेक प्रांतात स्त्रिया पुरुषांना ओवाळून त्यांचं औक्षण करतात, तर काही ठिकाणी ऐरावतावर आरूढ असणाऱ्या इंद्राची पूजा केली जाते. एका दंतकथेनुसार या दिवशी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी 'को जागर्ति- को जागर्ति..' 'अर्थात कोण जागं आहे, कोण जागं आहे,' अशी साद घालत फिरते. जो जागा असेल, त्याच्या घरी ती प्रवेश करते.

आपल्या गोव्यातील मंदिरांमध्ये धार्मिक व पारंपरिक रीतीरिवाजानुसार हा उत्सव साजरा करण्याची प्रथा जपली जात आहे. म्हार्दोळ-फोंडा येथील श्री महालसादेवीच्या मंदिरात मोठ्या थाटात कोजागरी उत्सव साजरा होतो. काही देवस्थानात कोजागरी पौर्णिमेच्या रात्री देवीच्या पालखीची मिरवणूकही काढण्यात येते. गुजराथ, ओरिसा, प. बंगाल, महाराष्ट्र, गोवा या राज्यांत कोजागरी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. गुजरातमध्ये 'शरद पुनम' या नावाने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचे 'गरबा नृत्य' व 'रासलीला' हे मुख्य वैशिष्ट्य आहे, तर ओरिसामध्ये भाविक भव्य मंडप उभारून 'कुमार-कार्तिकेय' (भगवान शिव-पुत्र) देवाची मोठ्या थाटात पूजा, प्रार्थना करून हा उत्सव साजरा करतात. ओरिसामध्ये त्यालाच 'कुमार पौर्णिमा' असेही संबोधतात.

चंद्राला दीप दाखवणे- 'दीपदान' हे या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. म्हणूनच या रात्री मंदिराच्या दीपस्तंभावरील सर्व दीप पेटवून मंदिराचा परिसर उजळवून टाकण्याची प्रथा आहे. लक्ष्मीदेवी आणि इंद्रदेवाची पूजा करणे, 'अग्रायण' होम करणे (नवे तांदूळ अग्नीदेवाला अर्पण करणे) आदी विधी आश्विन पौर्णिमेला करण्यात येतात. पहिले धान्यकण देवाला अर्पण केल्यानंतरच आपण खाण्याचे बंधन शेतकरी पाळतात, म्हणून ही पौर्णिमा 'नव्याची पौर्णिमा' किंवा ' नव्याची पुनव' या नावाने साजरी करण्याची प्रथा विशेषतः गोव्यात आजही प्रचलित आहे.

... (चर्चा) १४:५५, ११ डिसेंबर २०१७ (IST)[reply]


शिवाय कोणत्याही पंचांगात आश्विन पौर्णिमा पहा. शरद पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा अशा नोंदी सापडतील. ... (चर्चा) १५:१०, ११ डिसेंबर २०१७ (IST)[reply]


हेही पहा :-

[१]


... (चर्चा) १५:२१, ११ डिसेंबर २०१७ (IST)[reply]