गर्भपात (पशु)
गर्भपात हा गर्भ धारण करण्यास सक्षम अशा सर्व मानव व प्राण्यांमध्ये होणारी एक शरीराची अवस्था आहे. त्यामध्ये गर्भाशयात असणारा गर्भ आपोआप बाहेर पडतो अथवा प्रकृतीच्या काही कारणास्तव किंवा उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तो वैद्यकीय ज्ञान वापरून बाहेर काढण्यात येतो. 'गर्भपात होणे' ही नैसर्गिकरित्या घडणारी एक क्रिया आहे तर,'गर्भपात करणे' अथवा 'करविणे' हे मानवनिर्मित असते. पशुंबाबत होणाऱ्या गर्भपातास इंग्रजीत 'बुसेल्लोसिस' असे नाव आहे.दुधाळू जनावरांमध्ये अथवा गुरांमध्ये उद्भवणाऱ्या गर्भपातास 'ब्रुसेल्ला ॲबॉर्टस्' हे विषाणू कारणीभूत असतात.
इतर नावे
[संपादन]यास स्थानिक भाषेत 'गर्भपात'च म्हणतात
लक्षणे
[संपादन]असे बघण्यात आले आहे कि, गाय व म्हैस या जनांवरांमध्ये गर्भपात हा बहुदा सात महिन्याची गर्भावस्था किंवा त्यानंतर होतात.[ संदर्भ हवा ]यात गुरांच्या योनीतून पिवळसर,तपकीरी अथवा चॉकलेटी रंगाचा स्त्राव वाहतो.जनावराची झार अथवा वार लवकर पडत नाही.
औषधोपचार
[संपादन]गर्भपात झालेल्या जनावरास वेगळे बांधावे व पशुवैद्यकीय डॉक्टरांचे सल्ल्याने औषधोपचार करावा.
प्रतिबंधक उपाय
[संपादन]नवीन जनावर विकत घेतेवेळी, ते निरोगी आहे याची खात्री करून घ्यावी.त्याला कुठल्याही वळुद्वारे गर्भधारणा करवू नये. सकस पिल्लांसाठी कृत्रीम रेतन पद्धतीचा वापर करावा.
हेही बघा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |