Jump to content

वास्तव संख्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुरुवातीला संख्या शिकताना लवकरच संख्यारेषा तयार करायला शिकवले जाते. सोयीचा एकक घेउन ती तयार करतात. नंतर अपूर्णांक संख्यारेषेवर दाखवायला आपण शिकतो. हे अपूर्णांक ३/५ , २/७ अशा प्रकारचे म्हणजे परिमेय संख्या असतात. पायथागोरसचे प्रमेय वापरून २ चेवर्गमूळ व तत्सम संख्या देखील संख्यारेषेवर दाखवता येतात. याप्रमाणे संख्यारेषेवर बिंदूने दाखवता येणाऱ्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात.